भद्रावती तालुक्यातील चालक-मालक धडकले विधानभवनावर

131
  • वाहनचालकांच्या मागण्या घेऊन जय संघर्ष वाहनचालकांचा विधानभवनावर भव्य मोर्चा

भद्रावती (तालुका प्रतिनिधी) :

.            चालक-मालकांच्या विविध मागण्या घेवुन भद्रावती तालुक्यातून असंख्य चालक-मालक दि.१३ डिसेंबर ला विधानभवनावर झालेल्या मोर्चामध्ये सहभागी झाले.

.             जय संघर्ष चालक-मालक सामाजिक संस्थेचे संस्थापक संजय हाळणोर यांच्या नेतृत्वात या भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून असंख्य चालक-मालक सहभागी झाले होते. यशवंत स्टेडीयम येथुन निघालेल्या या मोर्चाला टेकडी रोडवरच पोलिसांच्या ताफ्यानी रोकले. मोर्चात सहभागी झालेल्या चालक-मालकांनी जोरदार नारेबाजी करून आपल्या मागण्या सरकार पर्यंत पोहचविल्या. वाहनचालकांचा आक्रोश पाहुन जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थाचे संस्थापक संजय हाळणोर आणि पदाधिकाऱ्यांना दादा भुसे मंत्री यांच्या भेटीस बोलावुन वाहन चालक-मालक यांच्या समस्या जाणून घेतल्या व यावर नक्की तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.   या भव्य मोर्चात संजय हाळणोर यांच्या नेतृत्वात भद्रावती शहरातील विनोद उपगन्लावार, आरिफ शेख, किरण घुगरे, गोलु गोहाने, रूपेश वैद्य, राहुल बोरकर, रोशन ईखार, रतन सुकारे, सुरज येंडे, रूपेश वैद्य, गोलु गोहने, गोलु चौवरडोल, अंकुश गोवारदीपे, प्रदीप मोहीतकर, संदीप पाल, गणपत आस्कर, राकेश बावने, रवी खारकर, निलेश खुटेमाटे, हरीदास खोब्रागडे, अशोक आस्वले आणि असंख्य चालक-मालक सहभागी झाले होते.

.             काय आहेत मागण्या

.                 बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी.वाहन चालकांसाठी आर्थिक महामंडळ स्थापण करावे.जीप या प्रकारात येणाऱ्या सर्व प्रवाशी वाहनांची प्रवाशी क्षमता वाढवावी.वाहण चालकांच्या सुरक्षतेसाठी कठोर कायदा करावा.वाहन चालकांच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, मोफत शिक्षणाची सोय करावी.बांधकाम मजूरांच्या सर्व योजनात अवजड वाहन चालविणाऱ्या वाहन चालकाचा समावेश करावा.अपघाती मृत्यू झाल्यास वाहन चालकास २५ लाख रूपये तर अपंगत्व आल्यास १० लाख रूपयांची मदत करावी.