विसापूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज गाजणार

35

कोळसा खाणीला ना हरकत प्रमाणपत्रावरुन खडाजंगीची शक्यता

सन्फ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीचे प्रकरण

चंद्रपूर

.          केंद्र सरकारच्या कोल मंत्रालयाने विसापूर व नांदगाव (पोडे) शेत शिवारातील कोलब्लॉक भूमिगत कोळसा खाणीसाठी निर्धारित केला. हा कोलब्लॉक मधून कोळसा उत्खनन करण्यासाठी सन्फ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीला परवानगी दिली आहे. आता या कंपनीला बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे आहे.त्यासाठी विसापूर ग्रामपंचायतीने मंगळवार ( दि. ५ ) डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ग्रामसभा आयोजित केली आहे. ही ग्रामसभा चांगलीच गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

.          बल्लारपूर तालुक्यातील विसापूर व नांदगाव ( पोडे ) शेत शिवारातील निवडक शेतकऱ्यांची १0 हेक्टर जमीन भिवकुंड कोलब्लॉक साठी खरेदी करून कोळसा भुर्भातून उत्खनन करणार आहे. हा विस्तार विसापूर व नांदगाव ( पोडे ) शेत शिवारात असून ८0२ हेक्टर आर जमीन दरम्यान आहे. यावर गावातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी समितीने जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये बैठकीत आक्षेप घेतला होता.त्यावेळी मात्र ग्रामपंचायतला कोणत्याही प्रकारे विचारात घेण्यात आले नाही.आता मात्र सन्फ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीने विसापूर ग्रामपंचायतीने भूमिगत कोळसा खाणीच्या कोळसा उत्खनन करण्यासंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला मागितले आहे.

.          या अनुसंगाने विसापूर ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा मंगळवार (दि. ५) डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयात आयोजित केली आहे. या ग्रामसभेत सन्फ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीला ना हरकत प्रमाणपत्र देण्यावरून गावाकऱ्यांची चांगलीच खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेगवेगळे मत प्रवाह उमटण्याची शक्यता आहे. हे सर्व गावाच्या हितासाठी किती जनता एकवतते यावर अवलंबून आहे. या निमित्याने गावकऱ्यांचे लक्ष उद्या होणाऱ्या ग्रामसभेकडे लागले आहे.

आमचा भूमिगत कोळसा खाणीला विरोध नाही.गावात उद्योग येऊन बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे.गावाची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे.व्यापार तग धरून राहिला पाहिजे.त्याच प्रमाणे शेतीही राहिली पाहिजे.केंद्र व राज्य शासनाने भूमिगत कोळसा खाणीला परवानगी दिल्याने ,औपचारिकता म्हणून विसापूर ग्रामपंचातीला कोळसा उत्खनन करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. हा निर्णय सर्वस्वी ग्रामसभेचा आहे.                                                                                                                                                                                                                                                रामभाऊ टोंगे, माजी जि. प.सदस्य तथा अध्यक्ष गाव बचाव कृती समिती,विसापूर.