वरोरा शहरात राष्ट्रीय स्तरीय नृत्य स्पर्धा

128

देशभरातील एका पेक्षा एक डान्सर  होणार सहभागी

७ लाख ७० हजाराचे रोख पारितोषिक

वरोरा

हॉटेल ग्रीन वे व बाबुलाल आईस्क्रीम आयोजित राजवारसा  प्रॉडक्शन प्रस्तुत बुगी उगी २०२३ या भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय स्तरीय नृत्य स्पर्धेचे येत्या १५  ते १७ डिसेंबर दरम्यान स्थानिक आलिशान ग्राउंड येथे  आयोजन करण्यात आले आहे.

वरोरा शहरात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात ग्रुप डान्स (समूह नृत्य), सोलो डान्स (एकल नृत्य), डूयल (युगल डान्स),  किड्स डान्स (लहान मुलांचे नृत्य) असे एकूण चार गटात स्पर्धेची विभागणी करण्यात आली आहे. त्याच सोबत स्पर्धेत सभागी स्पार्धकांना स्मृतिचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार तसेच या स्पर्धकांमधून बेस्ट वरोरा, बेस्ट चंद्रपूर, बेस्ट विदर्भ, बेस्ट महाराष्ट्र डान्सर निवडण्यात येणार आहे. त्यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत उत्कृष्ट डान्स करणाऱ्या विजेत्या डान्सर ला राजवारसा प्रॉडक्शन निर्मित पुढील चित्रपटामध्ये नृत्याची तसेच अभिनयाची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे तसेच या स्पर्धे करिता  देशातील विविध राज्यातून एका पेक्षा एक डान्सर सहभागी होणार असून या ऐतिहासिक नृत्य स्पर्धेचे वरोरा करांनी साक्षदार व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. हि स्पर्धा पासेस व तिकीट काढून बघता येणार असून याची अडवान्स बुकिंग सुरु झालेली असल्याची माहिती हि आयोजकांनी दिली. अधिक माहिती करिता आपण हॉटेल ग्रीन वे चे संचालक शुभम चिमुरकर व बाबुलाल आईस्क्रीम चे संचालक नीरज चौधरी यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजकांनी सांगितले आहे.

.                            भरगच्च बक्षीसाची मेजवानी                                                                                                                                                                     ग्रुप डान्स (समूह नृत्य)  प्रथम पारितोषिक १ लाख ५० हजार, द्वितीय १ लाख, तृतीय ५०, हजार, चतुर्थ  पारितोषिक २० हजार रुपये, पंचम  पारितोषिक १० हजार, सोलो डान्स (एकल नृत्य) करीता प्रथम १ लाख, द्वितीय  ५० हजार,  तृतीय  पारितोषिक २० हजार रुपये, चतुर्थ पारितोषिक १० हजार, पंचम ५ हजार, डूयत (युगल डान्स),  करीता प्रथम ८० हजार, द्वितीय  ५० हजार,  तृतीय  पारितोषिक २० हजार रुपये, चतुर्थ पारितोषिक १० हजार, पंचम ५ हजार, किड्स डान्स (लहान मुलांचे नृत्य) प्रथम ५० हजार, द्वितीय  20  हजार,  तृतीय  पारितोषिक १०  हजार रुपये, चतुर्थ पारितोषिक 7 हजार, पंचम ३ हजार  असे एकूण चार गटात स्पर्धेची विभागणी करण्यात आली आहे. त्याच सोबत स्पर्धेत सभागी स्पार्धकांना स्मृतिचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार तसेच या स्पर्धकांमधून बेस्ट वरोरा, बेस्ट चंद्रपूर, बेस्ट विदर्भ, बेस्ट महाराष्ट्र डान्सर निवडण्यात येणार आहे. त्यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत उत्कृष्ट डान्स करणाऱ्या विजेत्या डान्सर ला राजवारसा प्रॉडक्शन निर्मित पुढील चित्रपटामध्ये नृत्याची तसेच अभिनयाची संधी मिळणार आहे.