महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाच्या अधिकारी/कर्मचा-यांचे सलग तिसऱ्या दिवशी अन्नत्याग सत्याग्रह सुरूच

34

कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत शासनाचे दुर्लक्ष

आंदोलनातील १५० पैकी २५ कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली

४ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन करणार

चंद्रपुर

.         महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम शासनस्तरावरून मिळावी याकरिता १ डिसेंबरपासून महामंडळातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचा-यांनी नागपूर,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, नाशिक, पुणे, ठाणे, पालघर या जिल्ह्यात सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. सदर आंदोलनतील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी अशा २५ लोकांची प्रकृती खालावली असून त्यांना वैद्यकीय उपचाराच्या सूचना वैद्यकीय अधिकारी यांनी दिल्या आहेत.

.         यातील काही कर्मचारी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार देत असून जोपर्यंत मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत अन्नत्याग सत्याग्रह सुरूच ठेवू,अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.दरम्यान वनविकास महामंडळातील अधिकारी व कर्मचारी उद्या (दि.४) पासून आता पूर्णपणे काम बंद आंदोलन करणार आहेत.याचवेळी त्यांच्या मागणी पूर्ण होईपर्यंत अन्नत्याग सत्याग्रह सुरूच राहणार आहे.

.         संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास दोन हजार कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यास शासन व प्रशासनाची डोकेदुखी वाढवणार,हे नक्की. दरम्यान या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ शासनाने महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासंदर्भात तात्काळ मंजुरी द्यावी अन्यथा पुन्हा आंदोलन तीव्र करू,अशी ठाम भूमिका महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ कर्मचारी संघटनेने घेतल्याची माहिती वनविकास महामंडळ कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील,कार्याध्यक्ष बी.बी.पाटील,सरचिटणीस रमेश बलैया,उपाध्यक्ष राहुल वाघ,रवी रोटे,सचिव कृष्णा सानप,अभिजीत राळे,गणेश शिंदे,सुधाकर राठोड,श्याम शिंपाळे,मनोज काळे,दिनेश आडे,प्रतीक्षा दैवलकर यांनी संयुक्त पत्रकातून दिली आहे.