रेल्वेचे अनारक्षित तिकीट बंद

36

प्रवाशांची झाली फजिती : रेल्वे प्रशासनाचा गोधंळात गोंधळ

नागभीड

.          नागभीडच्या रेल्वे स्टेशन येथुन अनारक्षित तिकीट बंद झाल्याने प्रवाशांची फजीती झाली आहे. रेल्वे प्रशासनाने जनहीतासाठी तिकीट काऊंटर सुरु करावे अशी मागणी होत आहे. गेल्या आठवड्या पासुन सर्वच रेल्वे स्थानका वरील लोकल अनारक्षित तिकीट आँनलाईन करण्यात आले आहे.

.          त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्वच तिकीट काऊंटर बंद केले आहेत.याचा ञास ग्रामीण भागातील प्रवाशांना होत आहे. रेल्वे प्रशासनाने युटीएस अँप वारण्याचा सल्ला दिला आहे. युटीएस अँप डाऊनलोड करुन प्रवाशांनी तिकीट खरेदी करावी. असे प्रवाशांना सांगण्यात येत आहे.तसे युटीएस आँनलाईन अँपचे बोर्ड सर्वच रेल्वेच्या तिकीट काऊंटर जवळ लागले आहेत.आपल्या मोबाईल वरुन युटीएस अँप डाऊनलोड करायची आहे. आणी अँप वरुनच तिकीट काढायची आहे. हे कीतपत नागरीकांना शक्य आहे. ग्रामीण भागातील नागरीकांकडे साधा मोबाईल सुद्धा नाही. मग ग्रामीण भागातील नागरीकांनी रेल्वेनी प्रवास करायचा नाही काय ? ही डोकेदुखी रेल्वे प्रशासनाने थांबवावी. रेल्वे प्रशासनाने स्वतःच्या सोयीसाठी ही युटीसएस आँनलाईन अँप आनली.त्याचा फायदा रेल्वे प्रशासनाला होणार हे निश्चित आहे.

.          माञ प्रवाशांच्या दृष्टीने हितावह नाही. या मार्गावर चालणाऱ्या गाड्या वेळेवर धावत नाही. त्यामुळे प्रवाशी कंटाळले आहेत.पुन्हा अँपद्वारे तिकीट काढने ही पून्हा डोकेदुखी वाढविनारी बाब आहे. रेल्वे प्रशासनाने युटीएस आनलाईन अँपची जनजागृती करायला पाहीजे होते माञ तसे न करता तिकीट काऊंटर बंद केले हे ऊचित नाही. प्रत्येक नागरीकाकडे स्मार्ट फोन नाही. तिकीट काढु शकत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुर्ववत तिकीट काऊंटर सुरु करावे अशी मागणी होत आहे.

रेल्वे प्रशासनाने सर्व प्रथम या युटीस अँप बद्दल जनजागृती करावी.मगच तिकीट काऊंटर बंद करावे.ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा ञास होत आहे.प्रवाशांची ओरड बगता रेल्वे प्रशासनाने पुर्ववत तिकीट काऊंटर सुरु करावे.                                                                                                                                                                                                                                  संजय हो.गजपुरे, दपुम रेल्वे सदस्य बिलासपुर झोन