विद्यार्थ्यांनो, नेहमी संशोधनाचा ध्यास बाळगा : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

46

बल्लारपूर तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शनीचे उदघाट्न   :   प्रदर्शनातील साहित्य प्रतिकृतीचे मान्यवरांनी केले अवलोकन

चंद्रपूर 

.        आजचे युग विज्ञानाचे आहे. माहिती व तंत्रज्ञान यांनी व्यापले आहे. आजघडीला विद्यार्थ्यांत न्यूटन जागा होने, गरजेचे आहे. अकल्पीत घडणाऱ्या घटनेचे विश्लेषण करताना, त्यामागील शास्त्रीय कारणाचा शोध घेण्याची वृत्ती बाळगा. त्यामुळेच आपल्या शिक्षण प्रवासातील संशोधक जागा होणार आहे. विद्यार्थ्यांनो, आपण नेहमीच संशोधनाचा ध्यास बाळगा, असे प्रतिपादन राज्याचे वने, संस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथे गुरुवारी केले.

.         बल्लारपूर पंचायत समितीच्या वतीने बामणी (दुधोली) येथील सेंट पाल हायस्कूल मध्ये बल्लारपूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी जि. प.सदस्य हरीश गेडाम, उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, तहसीलदार डा. कांचन जगताप, गटविकास अधिकारी अनिरुद्ध वाळके, संस्था अध्यक्ष अविनाश खैरे, निना खैरे, गटशिक्षणाधिकारी शरद बोरीकर, मुख्याध्यापक मनेका भांडुला, काशिसिंग यांची उपस्थिती होती.

.         यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विद्यार्थ्यांनो, तुम्ही शिक्षणाच्या प्रवासात असताना आपापल्या डोक्यातील नवसंकल्पना प्रत्यक्षात साकारल्या पाहिजे. शालेय अभ्यासक्रमांसोबत प्रश्नांची निर्मिती होत राहिली पाहिजे. विज्ञानाचा उपयोग सामान्यांच्या हितासाठी झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर झाले पाहिजे. यासाठी सात्यत पूर्ण अभ्यास व मानसिकता तयार करावी. यामुळेच आपले जीवन सार्थकी लागणार आहे, असे आवाहन पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

.         तत्पूर्वी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दीप प्रजवलीत करून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे थाटात उदघाट्न केले. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण केलेल्या विज्ञान साहित्य प्रतिकृतीचे अवलोकन करून त्यामागील भूमिका जाणून, मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शरद बोरीकर यांनी केले. संचालन सरोज चांदेकर यांनी केले, तर आभार गटविकास अधिकारी अनिरुद्ध वाळके यांनी मानले.