केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवा

50

 केंद्रीय सह सचीव आनंद पाटील यांच्या कर्मचार्‍यांना सूचना 

चंद्रपुर

.          गर्भवती महिलेपासून ते वृद्धा पर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या बर्‍याच योजना आहेत. मात्र त्या योजना अजूनही लोकांपर्यंत पोहचल्या नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांनी या योजना लोकांपर्यंत पोहचविल्या पाहिजे. अशा सूचना जिल्हा परिषद शाळा नंदोरी येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा दरम्यान केंद्रीय सह सचीव आनंद पाटील यांनी यावेळी कर्मचार्‍यांना दिल्या.

.          केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने भारत भर विकसित भारत संकल्प यात्रा ची मोहीम राबविल्या जात आहे. सदर मोहिमेच्या अंमलबजावणी साठी केंद्रीय सह सचीव आनंद पाटील हे जिल्ह्यातील सर्व गावांना विकसित भारत संकल्प यात्रा च्या माध्यमातून भेट देत केंद्र सरकारच्या योजनाचा आढावा घेत आहे.
विकसित भारत संकल्प यात्रा रथ सोमवारी वरोरा तालुक्यातील टेमुर्डा व भद्रावती तालुक्यातील नंदोरी या गावांना भेटी देऊन, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अत्योंदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडिट योजना, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल, जल जीवन मिशन, स्वामीत्व योजना, जनधन योजना, जीवनज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेंन्शन योजना, प्रधानमंत्री प्रणाम योजना, या योजनांची जाणीव जागृती करण्यात आली.

.         सदर योजना अद्यापपर्यंत ज्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी ग्रामसवेक, तलाठी, कृषी सहायक, मुख्याध्यापक, आरोग्य सेवक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व इतर सर्व शासकीय विभागाच्या ग्रामस्तरीय कर्मचार्‍यांनी उचित नियोजन करुन गरजुंपर्यंत पोहचुन त्यांना आवश्यक असलेला शासकीय योजनेचा लाभ देण्याकरीता निर्देश देण्यात आले.

.          यावेळी पत्रकारांशी बोलताना केंद्रीय सह सचीव आनंद पाटील म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रा च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १० मोबाईल व्हॅन गाड्या च्या माध्यमातून सर्व योजनांची माहिती दिल्या जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागळातील नागरिका पर्यंत पोहचविण्यासाठी ही रथ यात्रा काढली आहे. आणि या योजनाची अमलबजावणी करण्या करिता मी पुन्हा या गावांना भेटी देणार असल्याचे ही त्यांनी यावेळी संगितले. या विकसित भारत संकल्प यात्रेत सहाय्यक जिल्हाधिकारी भुर्गनाथम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना सोळंके, तहसिलदार अनिकेत सोनवणे, गटविकास अधिकारी ज्ञांनेश्वर सावसाकळे, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकुळकर, जि.प. शिक्षणाधिकारी राजकुमार हिवरे, उपशिक्षणाधिकारी देशमुख सह तलाठी, ग्रामसेवक, कृषी विभागाचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.          या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपसरपंच उषा लांबट, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य शरद खामणकर, सदस्य मंगेश भोयर, किशोर उमरे, अजित पुसनाके व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी  जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांनी अथक प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रा.प. माजी उपसरपंच मंगेश भोयर यांनी केले.

 विविध स्टॉल वर भेटी                                                                                                                                                                                                                                                                                        विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमा दरम्यान नंदोरी जिल्हा परिषद शाळेवर विविध योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते. केंद्रीय सहसचिव आनंद पाटील नंदोरी येथे दाखल होताच सर्वप्रथम त्यांनी उभारण्यात आलेल्या स्टॉल ला भेटी दिल्या. व त्यांच्या कडून योजनांचा आढावा घेण्यात आला. या दरम्यान पाटील यांना उत्तर देताना अनेक कर्मचारी चाचपळत होते. तर काही कर्मचार्‍यांनी पाटील यांना समाधान कारक माहितीच दिली नाही.