गोठयात घुसुन बिबट्याचा बकऱ्यावर हल्ला

38

बोथली येथील घटना

नेरी

.          नेरी येथुन जवळ असलेल्या बोथली येथील बाजीराव कारर्मेंगे यांच्या मालकीच्या बकऱ्याच्या गोठयात दि 25 नोव्हे ला रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने हमला करून बकरीवर ताव मारीत तिचा फडश्या पडला मात्र दावणीला बांधून असल्याने बिबट्याला तिला ओढत नेता आले नाही.

.          सविस्तर माहिती अशी की बोथली येथील बाजीराव कारमेंगे यांचे सुरवातीलाच गाई बकऱ्याचा गोठा आहे मात्र सभोवताल घरे सुद्धा आहेत परंतु एवढे असतानाही मध्यरात्री बिबट्या गावात आला काही वेळ तो दबा धरून बसला पण मध्यरात्री त्याने गोट्यावर आक्रमण केले आणि बकरीला ठार केले मात्र बाजूच्या सभागृहात झोपलेल्या मालकाला याची भनक सुद्धा लागली नाही. सकाळ होताच त्वरित गोठयात गेल्यावर सदर घटना उघडीस आली गावातील नागरिकांनी वनरक्षकाला माहिती देताच काजळसर बिटाचे वनरक्षक पाटील घटनास्थळी दाखल होत बकरीचा पंचनामा करून अहवाल वनविभागाला सादर केला सदर घटनेमुळे बकरी मालकाचे नुकसान झाले त्यामुळे वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.