विहीरगाव येथे धानाच्या ढिगाऱ्याला भीषण आग

40

पूजने जळून खाक :  शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान

अज्ञात इसमाने आग लावल्याचा संशय

नेरी

.          चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथील शेतकऱ्याने धान कापून शेतात ढिगारा मारला. मात्र या ढिगाऱ्याला अचानक आग लागल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. सदर आग अज्ञात इसमाने लावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर धान हे वाघेडा येथील शेतकरी शास्त्री भिकाजी जिवतोडे यांच्या मालकीचे असुन त्यांचे २ लाख रुपयाचे नुकसान झाले.

.          चिमूर तालुक्यातील वाघेडा येथील शेतकरी शास्त्री जीवतोडे त्यांची शेत जमीन विहीरगाव येथे असुन त्यांनी सर्वे नंबर १ व ३ मधील २.२९ हेक्टर मध्ये धान पीक लावले. आपल्या शेतात धानाची कापणी करून काही दिवसांपूर्वीच पुंजने तयार करून ठेवले होते. दरम्यान २५ नोव्हेंबर सायंकाळीच्या सुमारास धान पुंजण्याला आग लागली. यात संपूर्ण धान पुंजणे जळून खाक झाले. सकाळी शेतकऱ्यांना पूजने जवळ बघतले असता एका बॉटल मध्ये डिझेल,दोन मोठ्या बांबूच्या काठ्या, मोठे फटाके पाकीट आढळून आले असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी सांगितली आहे.

.          सुवर्णा प्रजातीच्या धानाचे एकूण ७० पोते धान मळणीनंतर होणार असा अंदाज शेतकरी जिवतोडे यांचा होता. जवळपास ६० क्विंटल धानाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.नगर परिषद चिमुर येथील अग्निशमक दलाने आग आटोक्यात आणली आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी एम. एम.दडमल विहीरगाव, व पोलीस विभाग यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यावेळी राजू कावळे ग्रामपंचायत सदस्य वाघेडा व शेजारील शेतकरी हजर होते.