घाटे अळीने धान पीक उध्वस्त : शेतकरी संकटात

46

नेरी

.           नेरी परिसरातील खांबाडा शेतपरिसरात धान पिकावर घाटे अळीने हैदोस मांडला असून अनेक शेतकऱ्याचा पिकांना नेस्तनाबूत केले असून ऐन पीक जोमात असताना हातात येणारे पीक घाटे अळी मुळे भुईसपाट झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटणार आहे तेव्हा शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत.

.           चिमूर तालुक्यातील नेरी परिसर हा धान पिकासाठी प्रसिद्ध असलेला परिसर असून मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते , याही वर्षी शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर धान पिकाची लागवड केली मात्र धान पीक मोट्या प्रमाणात होऊन भरघोस उत्पादन येणार असे चित्र असताना ऐन जोमात असलेल्या धान पिकाच्या लोबांवर घाटे अळीने आक्रमण करून लोंब कातरायला सुरवात केली असून हाती आलेले पीक घाटे अळीने फस्त केला आहे प्रत्येक बांधानात धानाच्या लोबाचे सडा न सडा पडलेला दिसत आहे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होऊन हवालदील झाले आहेत.

.           अनेकांनी घाटे अळीमूळे धान मळणीसाठी कापले आहेत मात्र कापलेल्या धानाला सुद्धा अळी मोट्या प्रमाणात लोंब कुतळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन कमी होणार असून धान्य मातीमोल झालेले आहे तर अनेकांच्या उभ्या पिकावर अळीने आक्रमण करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे यामुळे उत्पादन कमी होऊन शेतकरी कर्जाच्या खाईत लोटणार आहे तेव्हा या बाबीची दखल घेऊन प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन शेतकरी वर्गाला मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गात जोर धरत आहे.