संविधान दिनानिमित्त भद्रावतीत विविध कार्यक्रमासह रॅलीचे आयोजन

43

भद्रावती

.           संविधान नागरिक संवर्धन समिती भद्रावती तर्फे सविधान दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 रोज रविवारला शहरात विविध कार्यक्रमासह एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समिती तर्फे घेण्यात आलेल्या एका पत्र परिषदेतून देण्यात आली आहे.

.           रविवारी सकाळी 8:30 वाजता शहरातील हुतात्मा स्मारकातून भव्य रॅलीला सुरुवात होणार आहे . ही रॅली बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर तिचा समारोप होणार आहे .या रॅलीचे उद्घाटन भद्रावती- वरोरा क्षेत्राच्या आ. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी तहसीलदार अनिकेत सोनवणे, ठाणेदार बिपिन इंगळे ,मुख्याधिकारी विशाखा शेळखी व अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

.           त्यानंतर डॉ. आंबेडकर चौकात विद्यार्थ्याकरिता बिस्किट व फळांचे वाटप, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा “भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षकतेचा उचित अर्थ “या विषयावर घेण्यात येणार आहे. त्यानंतर ‘भारतीय संविधान माणुसकीचा सुरक्षा कवच’ या विषयावर दुसरी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येईल. याप्रसंगी 6 वाजता संविधान प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय पाटील राहतील तर उद्घाटक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, प्रमुख अतिथी म्हणून तुषार उमाळे, अनिकेत दुर्गे, भूपेंद्र रायपुरे, महेंद्र गावंडे, कुशल मेश्राम, सुशील देवगडे, शंकर मून, सुरेंद्र रायपुरे ,सुरज गावंडे, इंजिनियर प्रकाश पिंपळकर, विशाल बोरकर ,डॉ.अमित नगराळे ,रवींद्र तीराणिक, संदीप ढेगळे, डॉ. कार्तिक शिंदे ,सुनील मेश्राम, रत्नाकर साठे, नंदू पढाल, मनोज मोडक आदींची उपस्थिती राहणार आहे. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार तथा वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येईल. सदर रॅलीत व कार्यक्रमात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक समितीने केले आहे

.           पत्रपरिषदेला अनिकेत रायपुरे, सुमित हसतक, पनवेल शेंडे, वैभव पाटील, राजेंद्र पेटकर, सोनू चौधरी, भाग्यश्री शेंडे, पुष्पा राहुल गडे, रेणुका साने, सुवर्णा कोलटकर, मानसी देव, कल्पना देवगडे, विश्रांती उराडे आदींची उपस्थिती होती.