महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याला ठोकळ्या बेड्या

55

सोन्या-चांदीसह ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त 

चंद्रपूर

.         रोडवरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून सायकलवरून पळून जाणाऱ्या अट्टल चोरट्यास रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मंगेश वसंता हिंगाने (३५) रा. गाडगेबाबा चौक, चंद्रपूर असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

.         चंद्रपूर येथील बियाणी नगर मध्ये राहणाऱ्या सुनीता विजय कोकुलवार (६०) या सायंकाळी आपल्या घराच्या अंगणात दिवाळीनिमित्त रांगोळी टाकत असताना तोंडाला पांढऱ्या दुप्पटा बांधून आलेल्या इसमाने महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचा सोन्याचा गोप खेचून पळवला. अर्धी गोप त्याच्या हातात गेली तर अर्धी गोप तिथेच पडली. दरम्यान, आरोपी सायकलवरून पळून गेला. यासंदर्भात सुनीता कोकुलवार यांनी रामनगर पोलिस स्टेशन गाठून ११ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली. रामनगर पोलिसांनी तपास करून मंगेश वसंता हिंगाने याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली तसेच, यापूर्वी १२ ऑक्टोबर रोजी

.         दुर्गापूर हद्दीतील सुमित्रानगर, तुकूम येथील रोडवरून जाणाऱ्या एका महिलेल्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप हिसकावून नेल्याचीही कबुली दिली. पोलिसांनी सायकल व सोन्याचा गोप असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यास अटक केली.

.         ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.