सिंदेवाहीतील” उमेद अभियान” थंडावले?

50

◾तालुक्यातील महिला बचत गट अजूनही उपेक्षित

सिंदेवाही

.          मागील अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या हेतूने गावागावात मोठ्या प्रमाणात महिला बचत गट तयार करण्यात आले . या निमित्ताने महिलांना स्वयं बचत करण्याची एक चांगली सवय लावून देण्यात आली. परंतु सिंदेवाही तालुक्यातील उमेद अभियान थंडावले असल्याने या तालुक्यातील बचत गटातील महिला आजही उपेक्षित, शोषित असल्याचे चित्र दिसून येत आहे.

.          पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत उमेद या अभियानाद्वारे बचत गटातील महिला सदस्यांचा आर्थिक विकास साधला जाण्याकरिता अधिकृत एजन्सिस आहेत. परंतु या एजन्सिस कडून बचत गटातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात येत असल्याचा केवळ देखावा सिंदेवाही उमेद अभियान कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहे. प्रत्यक्षात तालुक्यात उमेद अंतर्गत चालत असलेल्या एकही महिला बचत गटाने कोणताही उद्योग उभारलेला दिसत नाही. मात्र कागदोपत्री असे उद्योग व्यवसाय दाखविले जात आहेत. तालुक्यातील बचत गटातील महिलांची आर्थिक उन्नती पाहिजे तशी झालेली दिसून येत नाही. या गटाच्या भरवशावर उपजीविकेचे कोणतेही शाश्वत साधन सामुग्री निर्माण केलेली दिसत नाही. गटाला जोडलेल्या महिला नेहमी मोलमजुरी करताना दिसत असल्याचे विदारक चित्र या तालुक्यात निर्माण झाले आहे. सिंदेवाही उमेद अभियान कार्यालया मार्फत महिलांच्या प्रगतीवर कथित स्तुती सुमने उधळली जात आहेत. ती स्तुतीसुमने सर्व फोल ठरली आहेत.

.          याउलट गटातील महिलांचे शारीरिक, आर्थिक, मानसिक, शोषण केल्या जात आहे. सिंदेवाही उमेद कार्यालयाने महिला बचत गटाकडून आतापर्यंत कुठे कुठे उद्योग सुरू केले. त्याची यादी प्रकाशित करावी. म्हणजे सत्यता पुढे येईल. एवढे मात्र खरे की, शासकीय कार्यक्रमात, मेळाव्यात गर्दी करण्यासाठी महिलांना गोळा केल्या जात आहे. सिंदेवाही तालुक्यात प्रत्येक गावागावात असंख्य महिला बचत गट आढळतील . परंतु त्या गावात महिला बचत गटाच्या माध्यमातून एकही व्यवसाय दिसून येत नाही. गटातील महिला या स्वतःच्या शेतात, किंवा इतरांच्या शेतात श्रमिक काम करताना अधिक प्रमाणात दिसून येत आहेत.