भद्रावतीत रोटरी उत्सव दिवाळी मेळ्याचे उद्घाटन थाटात

87

भद्रावती

.            भद्रावती चा दिवाळी मेळा हा संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे दिवाळीतील खास आकर्षण असून रोटरी क्लबच्या या दिवाळी उत्सव मेळ्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा दिवाळीतील आनंद हा अधिक द्विगुणीत होईल असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले. शहरातील तालुका क्रीडा संकुलनात रोटरी क्लबच्या दिवाळी मेळ्याचे मोठ्या थाटात उद्घाटन पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल धानोरकर, आयुध निर्माणीचे अप्पर महाप्रबंधक राकेश ओझा, ठाणेदार विपिन इंगळे, तहसीलदार अनिकेत सोनवणे, रोटरीचे सचिव सुधीर पारधी, उपाध्यक्ष अब्बास अजाणी, कोषाध्यक्ष विक्रांत बिसेन, उत्सव समिति अध्यक्ष डॉ माला प्रेमचंद, एड युवराज धानोरकर, किशोर पत्तीवार, वीवेक आकोजवार, प्रवीण महाजन, हनुमान घोटेकर, गिरीश पवार, आनंद क्षीरसागर, तुषार सातपुते, किशोर भोस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

.            नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखीत सात दिवस चालणाऱ्या या रोटरीच्या दिवाळी मेळ्याचा मनसोक्त आनंद लुटावा असे आवाहन यावेळी ठाणेदार विपिन इंगळे यांनी नागरिकांना केले. यावर्षी या दिवाळी मेळ्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली असून हा दिवाळी मेळा सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत तब्बल सात दिवसांपर्यंत चालणार आहे. दिनांक 19 ला दिवाळी मेळ्याचे खास आकर्षण असलेला फटाका शो पार पडल्यानंतर मेळ्याचा समारोप होणार आहे.

.            सदर दिवाळी मेळ्यात तंबोला, बॉडी बिल्डिंग शो, मौत का कुवा, विविध प्रकारचे आकाश पाळणे, विविध प्रकारचे झुले, फॅशन शो लावणी शो असे नागरिकांच्या करमणुकीसाठी खास आकर्षण आहे. याशिवाय विविध प्रकारची दुकाने व खवय्यांसाठी विविध प्रकारचे फुडस्टाल हेही या मेळाचे खास आकर्षण आहे.या रोटरी दिवाळी मेळ्याच्या पहिल्याच दिवशी नागरीकांनी प्रचंड प्रतिसाद देत या मेळ्याला गर्दी करीत मेळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. हा दिवाळी मेळा शांततेत पार पडावा यासाठी भद्रावती पोलीस प्रशासनातर्फे दिवाळी मेळा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.