ऍस्ट्रॅक कंपनीच्या वाहनाने बहिण भावाला उडवले

44

कारची दुचाकीला समोरासमोर धडक

शेंबळ गावाजवळील घटना

चंद्रपूर

.           वरोरा कडून वणी कडे जात असलेल्या दुचाकीला भरधावं वेगात जात असलेल्या ऍस्ट्रॅक कंपनीच्या कारने जबर धडक दिली यात दुचाकीवरील बहीण भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना शेबळ गावाजवळ दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. मोहन शंकर गडदे २६ श्रुती संजय गडदे २५ राहणार पावना असे जखमी बहीण भावाचे नाव आहे.

.           यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पडा येथे जात असताना वणी कडून वरोऱ्याकडे भरधावं वेगात येत असलेल्या ऍस्ट्रॅक कंपनीच्या वाहन क्रमांक एम एच ०१ सी वि ८०३४ ने दुचाकी ला जबर धडक दिली यात मोहन शंकर गडदे व त्याची बहीण श्रुती संजय गडदे दोघेही गंभीर जखमी झाले मोहन यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील डॉक्टर टोंगे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ऍस्ट्रॅक कंपनीचे वाहन वरोरा पोलीस स्टेशनं मध्ये जमा केले. मोहन चा पाय निकामी झाला असुन त्याला हॉस्पिटल चा खर्च अधिक असल्याने त्याला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी काही युवकांनी यावेळी केली.

.           सदर वाहन हे जिएमआर एम्को कंपनी वरोरा अंतर्गत ऍस्ट्रॅक कंपनीचे वाहन आहे. वृत्त लिही पर्यंत वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तर जीएमआर कंपनी अंतर्गत काम करत असलेल्या कॉन्ट्रॅक्ट कंपन्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार असुन एशट्रॅक कंपनीचे वाहन चालवीणाऱ्या चालकाकडे असलेला वाहन परवाना लॅप्स असल्याचे ही समोर आले असुन सरबजीत मिश्रा असे वाहन चालकाचे नाव आहे. वाहन चालवीण्याचा परवानाच लॅप्स असल्याने वरोरा पोलीस या वाहन चालकावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.