विसापुरातील फटाका बाजार ग्राहकांच्या गर्दीने बहरला

46

दहा विक्रेत्यांनी थाटली दुकाने :  फॅन्सी फटाके ग्राहकांच्या पसंतीचे केंद्र

चंद्रपूर 

.           चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्याच्या विसापूर गावातील फटाका बाजार ४२ वर्षांपासून प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या सणाला आतशबाजी होत असल्याने येथील फटाका बाजाराला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळाले आहे. येथील फटाका बाजारात चंद्रपूर जिल्ह्यातील दहा नामांकित फटाके विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे.ग्राहकांना येथील फटाका बाजारात फॅन्सी व रंगीबेरंगी फटाके पसंतीचे आकर्षण दिसून येत आहे. आठ दिवसाच्या विसापुरातील फटाका बाजार चांगलाच बहरला आहे.

.           विसापूर येथील फटाका बाजारात दरवर्षी लाखोंची उलाढाल होते.फटाके माफक व स्वस्त दरात मिळत असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.येथील बाजारात घाऊक व चिल्लर फटाके विक्रेत्यांनी फटाके विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. फॅन्सी,अनार,फुलझडी,फुलझड,राकेट, आकाशात फुटणारे रंगीबेरंगी फटाके ग्राहकांसाठी आकर्षण ठरत आहे. यामुळे ग्राहक या प्रकारच्या फटाक्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे.
विसापूर येथील फटाका बाजारामुळे आठ ते दहा दिवसांसाठी काही प्रमाणात गावातील बेरोजगारांना रोजगात मिळत आहे. काहींना खाद्य पदार्थाचा व्यवसाय मिळाला आहे.येथील फटाका बाजारामुळे गावात चहलपहल वाढली आहे.फटाके खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमुळे बाजाराला जत्रेचे स्वरूप आले आहे.विशेष म्हणजे फटाके खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना रांग लावून खरेदी करावी लागत आहे. याला कारणीभूत नामांकित कंपनीचे फटाके स्वस्त व माफक दरात मिळतात,हे आहे. पूर्वी येथील फटाका बाजारात चार ते पाचच्या संख्येत दुकाने लागत होते.ती संख्या आजघडीला दहा झाली आहे. हे येथील फटाका बाजाराचे वैशिष्ट्य ठरले आहे.दिवाळी सण मोठा,नाही आनंदाला तोटा,असे येथील फटाका बाजाराची प्रचिती आहे.