“ अबे तु मले शिकवते का, असे किती सरपंच पाहिले “

42

माजी उपसरपंचावर पोलीसाची दादागिरी

चंद्रपुर

.          बुधवारी जनजागृती करण्यासाठी ११२ क्रमांकाचे पोलिसांचे वाहन गावात आले. गावात चोर्‍याचे प्रमाण वाढत असल्याने गावकर्‍यांना सिसिटीव्ही कॅमेरे लावा असे पोलिसाकडून सांगण्यात आले. यावर माजी उपसरपंचाने उलटवार करीत पोलिसांच्या बंद कॅमेरा वर प्रकाश टाकला व मजूर वर्ग आपल्या घरी कॅमेरा कसा घेईल असे म्हणताच पोलिसदादा भडकला आणि चक्क ‘ अबे तु मले शिकवते का असे किती सरपंच पाहिले‘ असे अर्वाच्च्य भाषेत बोलत माजी उपसरपंच्याच्या अंगावर येत होता मात्र त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या कर्मचार्‍यांनी त्या युवा पोलिस अधिकार्‍यास परत नेले. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान वरोरा तालुक्यातील बोर्डा गावात घडली.

.          दोन दिवसापासून थंडी पडू लागली. हिवाळा सुरू झाला की थंडीचा फायदा घेत चोरटे चोर्‍या करतात. म्हणून गावागावात पोलिस प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. वरोरा तालुक्यातील बोर्डा या गावात रात्री ९ वाजताच्या दरम्यान ११२ क्रमांकाचे पोलीसाचे वाहन आले. वाहना भोवताल गावकरी जमा झाले. त्याच दरम्यान शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जात असलेल्या शेतकर्‍याला पोलिसांनी थांबविले. शेतकर्‍यांने पोलिसांना काय झाले असे विचारले असता पोलिसांनी त्याला म्हटले की गावात दिवाळीचे फटाके फोडायचे आहे. असे सांगण्यात आले. त्यानंतर गावात चोर्‍या होत आहे त्यामुळे गावकर्‍यांनी सिसिटीव्ही कॅमेरे लावावे. यावर शेतकरी असलेल्या माजी उपसरपंच धनराज आसुटकर यांनी बोर्डा चौकात पोलिस प्रशासनानी लावण्यात आलेल्या बंद कॅमेरा वर प्रकाश टाकत गरीब मोल मजुरी करणारा मजूर घरी कॅमेरा कसा लावेल असे म्हणताच पोलिस दादा भडकला आणि अबे तु मले शिकवते का असे किती सरपंच पाहिले असे म्हणत त्या माजी उपसरपंच्याच्या अंगावर धावून येत होता मात्र सोबत असलेल्या कर्मचार्‍यांनी त्याला सावरले आणि परत घेऊन गेले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. एका जागृत नागरिकांनी समस्याचे वास्तव मांडले म्हणून पोलिसांनी अशी दादागिरी करणे हे कितपत योग्य. वर्दीचा माज आलेल्या त्या पोलिस अधिकार्‍यावर कारवाई करा अशी मागणी माजी उपसरपंच धनराज आसुटकर यांनी केली आहे.