आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ११ डिसेंबर ला धनगर समाजाचा भव्य मोर्चा

43

चंद्रपुर

.           धनगर समाज तब्बल 75 वर्षापासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी वारंवार खोटी आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल केली त्यांना येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धनगर समाज जागा दाखवेल असा इशारा सकल धनगर समाज समन्वय समिती च्या वतीने देण्यात आला आहे.

.           अनुसूचित जमाती आरक्षणासाठी अंमलबजावणी करावी या मुख्य मागणी करिता येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर विधान भवनावर सकल धनगर समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता यशवंत स्टेडियम नागपूर येथुन विधान भावनावर भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. आयोजित मोर्चा हा कोणत्याही राजकीय पक्षाद्वारे आयोजित केला नसून समाजातील सामाजिक संघटनांचे पुढाकाराने आयोजित करण्यात येत आहे.त्या करिता समाजाच्या घटनादत्त व न्यायोचित मागण्यांसाठी राज्यातील लाखोच्या संख्येने मोर्च्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी नागपूर येथील धनगर समाज पदाधिकारी यांनी वरोरा दौऱ्यावर आले असता येथील समाज बांधवाना संबोधित केले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे, सेनेट सदस्य वामन तुर्के, धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल ढोले, धनगर युवक मंडळाचे रमेश पाटील, अँड मार्तंड गोडे, उत्तम चिव्हाने, गणेश पावडे, शिरीष उगे उपस्थित होते.