वरोरा चिमुर महामार्गावर अपघाताची श्रुंखला थांबता थांबेना . . .

36

       अर्धवट महामार्गाने घेतला कृषी सहाय्यकाचा बळी       

चंद्रपुर

.            वरोरा चिमुर महामार्गाचे बांधकाम अत्यंत संतगतीने सुरू असून ठिकठिकाणी रस्त्याचे बांधकाम अर्धवट सोडल्या गेल्याने दररोज या मार्गावर अपघात घडत आहे. तर २२ ऑक्टोबरला गोंडपिपरी येथील कृषी सहाय्यकाचा नाहक बळी गेला. मात्र या महामार्गाकडे कुणाचेच लक्ष वेधत नाही ही शोकांतिका आहे.

.            वरोरा चिमुर महामार्ग हा ५२ किलोमीटर अंतराचा रस्ता आहे मात्र ५ वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही अद्यापही पूर्णत्वात गेला नाही. ठिकठिकाणी रस्त्याचे बांधकाम अर्धवट सोडल्या गेले आहे. अर्धवट रस्ता जिथे संपतो तिथे साधे रिपलेक्टर सुद्धा लावल्या गेले नाही. परिणामी रात्रीच्या वेळेस दुचाकी असो की चारचाकी वाहन रस्त्याच्या खाली उतरून अपघात घडत आहे. या महामार्गाने कर्मचारी व परिसरातील गावकरी दुचाकीने येणे जाणे करतात. दिवसा असो की रात्र जीव मुठीत घेऊन कसरत करीत वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे.

.            वरोरा शहरातील आनंदवन चौक पासून काही अंतरावर महाविद्यालये आहे. माता महाकाली तंत्र निकेतन जवळ पुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्ता अर्धवट सोडला. रस्ता संपला आहे किंवा रस्ता संपला असल्याची माहिती देणारे याठिकाणी फलक सुद्धा लावल्या गेले नाही. दि. २२ ऑक्टोबर २०२३ ला गोंडपिपरी येथील कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सहाय्यक पदावर अधिक्षक पदावर असलेले शरद देवराव बोधाने (४४) हे कार्यरत होते. त्यांना शनिवार व रविवार ला सूट्टी असल्याने ते वरोरा येथे आपल्या घरी आले होते. सुट्टी असल्याने ते वडिलोपार्जीत असेलेल्या मौजा दादापूर येथील शेतात गेले. दिवसभर शेतातील पिके पाहून रात्री वरोरा येथे परत येत असताना रात्रो ८ वाजताच्या सुमाराम माता महाकाली पोलीटेक्नीक कॉलेज जवळ असलेला अर्धवट रस्त्या जवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे सरळ पुला जवळ खोदलेल्या खड्ड्यात पडले. सर्वत्र अंधार असल्याने काही काळ ते पडूनच राहिले. मोठ्या वाहनाच्या लाईट च्या प्रकाशाने या मार्गाने ये जा करणार्‍या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना नागरिकांनी उचलून उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपुर येथे रेफर केले. चंद्रपुर येथील यशोधन हेल्थकेअर रुग्णालयात त्यांचे दि २३ ऑक्टोबर ला सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची आई, पत्नी, दोन लहान मुले, भाऊ व बहीण असा बराच आप्त परिवार आहे.