दोषी पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन करा तेव्हाच प्रेत उचलू

36

 मृतकाचे प्रेत शंकरपुर पोलीस चौकीत      शंकरपुर येथील घटना : गावात तणाव 

नेरी

.             शेतकरी पती – पत्नी पायदळ शेतात जात असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने शेतकरी दांपत्याला धडक दिली. यात पती पत्नी गंभीर जखमी झाले मात्र पतीचा उपचारा दरम्यान पतीचा मृत्यू झाला. धडक देणारा दुचाकी चालक दारूच्या नशेत वाहन चालवीत होता असा आरोप नागरिकांनी केला असून त्या दुचाकी चालकाची वैद्यकीय तपासणी व कारवाई न करताच सोडून दिल्याने शंकरपुर पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी दोषी असून जोपर्यंत दोषी पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यन्त प्रेत उचलणार नाही ही भूमिका गावकर्‍यांनी घेतल्याने काही काळ तनाव निर्माण झाला होता. किसन चौधरी (४०) असे मृत शेतकर्‍यांचे नाव आहे.

.             प्राप्त माहितीनुसार शंकरपूर येथे सोमवार ला बाजार असल्याने बाजार मार्गाला मोठी गर्दी असते. याच गर्दीतून शेतकरी किसन चौधरी व त्याची पत्नी ही शेतावर पायदळ जात असताना मागून अति वेगाने येणाऱ्या दुचाकी वाहनांने जोरदार धडक दिली. यात किसन चौधरी हे जागेवरच बेशुद्ध झाले तर पत्नीला सुद्धा जोरदार मार बसला. अपघात होताच जवळ असलेल्या नागरिकांनी तत्काळ दोन्ही जखमींना शांकरपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय चिमूर व तिथून नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान किसनचा मृत्यू झाला. मृत्युची माहिती मिळताच त्यांच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

.             त्यानंतर सदर धडक देणारा वाहन चालक हा दारूच्या नशेत वाहन चालवीत होता असा आरोप नागरिकांनी केलेला असून पोलिसांनी संबंधित आरोपीची वैद्यकीय तपासणी न करताच त्याला सोडून देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या आरोपींना तत्काळ अटक कारवाई या मागणी करीता गावातील संतप्त नागरिकांनी मृतकाचे प्रेत पोलीस चौकी शंकरपूर येथे आणून ठेवण्यात आले. यावेळी जवळपास 500 च्या वर नागरिकांनी दोषींना वाचविनाऱ्या पोलिसांना निलंबित करा असे नारे दिले. त्यामुळे शंकरपुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले या सगळ्या प्रकाराला शंकरपूर पोलीस चौकीचे पोलीस जबाबदार असल्याचा नागरिकांनी आरोप केलेला आहे. पोलिसांना निलंबित करा तरच प्रेत आम्ही उचलू अशी मागणी नागरिकांनी लावून धरली होती.

.             यावेळी माजी आमदार अविनाश वारजूकर तसेच माजी जि. प.अध्यक्ष सतीश वारजुकर व उपसरपंच अशोक चौधरी, माजी सरपंच सविता चौधरी उपस्थित होते. वृत्तकन लोहिस्तोवर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नव्हता.