साहेब जन्म – मृत्यू दाखल्याची नोंद करायची तरी कुठे ?

36

वरोरा

.          जन्माची व मृत्यूची नोंद करण्याचे अधिकार कोर्टात प्रकरण सादर करून सदर आदेशानुसार नोंदनी घेणे जून महिन्यापर्यंत सुरू होते त्या नंतर 11 ऑगस्ट 2023 ला भारत राजपत्र प्रसिद्ध करून महसूल विभागाला सदर अधिकार परत देण्यात आले. परंतु आज चार महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा महसूल विभागात याबाबत कोणतीही ऑनलाईन प्रणाली सुरू केलेली नसून साहेब आम्ही जन्म मृत्यूची नोंद करायची तरी कुठे असा सवाल आता नागरिक करताना दिसत आहे.

.          जन्म मृत्यू नोंदणी करण्याचे अधिकार संबंधित नगर परिषद नगरपंचायत ग्रामपंचायत महानगरपालिका यांना जन्म झाल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत जन्म – मृत्यूची नोंद करणे बंधनकारक आहे. परंतु अनेक लोकांच्या अज्ञानीपणामुळे नोंदणी घेण्यात आल्या नाही तर अश्या नोंदणी घेण्याकरीता महसूल विभागाच्या आदेशानुसार संबंधित विभाग नोंद घेत होते. तहसीलदार यांच्याकडे अर्ज सादर करून अर्जावर सुनावणी घेऊन आदेश पारित करण्याचे अधिकार तहसीलदार यांना देण्यात आले होते परंतु तहसीलदारा कडील अधिकार हे सन 2011 पूर्वी शासनाने काढून घेतले होते व त्या नंतर सदर जन्माची व मृत्यूची नोंद करण्याचे अधिकार कोर्टात प्रकरण सादर करून सदर आदेशानुसार नोंदनी घेणे जून महिन्यापर्यंत सुरू होते त्या नंतर 11 ऑगस्ट 2023 ला भारत राजपत्र प्रसिद्ध करून महसूल विभागाला सदर अधिकार परत देण्यात आले. परंतु आज चार महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा महसूल विभागात याबाबत कोणतीही ऑनलाईन प्रणाली सुरू केलेली नसून साहेब आम्ही जन्म मृत्यूची नोंद करायची तरी कुठे असे जनतेकडून ऐकाला मिळत आहे.