Home चंद्रपुर जिल्हा विशेष एनडी हॉटेलमध्ये जुगार पकडला

एनडी हॉटेलमध्ये जुगार पकडला

938

10 जणांना बेड्या

3 लाखाची रोकड जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील प्रसिद्ध असलेल्या एनडी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि. २७ ) रात्री धाड टाकली. या कारवाईत तब्बल ३ लाख १० हजार ६१० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, दहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीही या हॉटेलमध्ये जुगार अड्डा उघडकीस आला होता.

.         चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नागपूर मार्गावरील हॉटेलमध्ये ११२ नंबरच्या खोलीमध्ये ५२ तास पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या आधारे रविवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी दहा जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून ५२ तास पत्ते आणि तीन लाख दहा हजार सहाशे दहा रुपये रोख आढळून आली. यात समीर अराडे, दिलीप जेठानी, उमेश खाटे, योगेश्वर पंडित, प्रभाकर येनगंदेलवार, गोवर्धन चंदेल, हमीद शरीफ, भोला दास, शिवम हसानी आणि संतोष आंबे अशी आरोपीची नावे असून 10 ही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रामनगर पोलीस ठाण्यामध्ये या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.       ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा जय सिंह, चेतन गज्जलवार, पोअं. प्रशांत नागोसे, शशांक बादामवार, मिलींद जांभुळे, नितीन रायपुरे, किशोर वाकाटे यांनी केली आहे.

error: Content is protected !!