खडसंगी येथे . माणिका देवी सभागृह भूमिपूजनाचा शुभारंभ*

38

माना समाजाच्या वतीने आमदार भांगडिया यांचे जंगी स्वागत

चिमूर

.          तालुक्यातील खडसंगी येथे २ कोटी रुपयांच्या . माणिका देवी सभागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार कीर्तिकुमार भांगडीया* यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार भांगडिया यांनी सर्वप्रथम गुरुदेव सेवा मंडळाला भेट दिली आणि वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मूर्तीला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर समाजबांधवांसोबत मुख्य मार्गाने पायी चालत मिरवणुकीत सहभाग घेतला. भूमिपूजन स्थळी उपस्थित मान्यवरांसह कुदळ मारून व फलकाचे अनावरण करून माँ माणिका सभागृह बांधकामाचा शुभारंभ केला. तसेच, समाजबांधवांसह झेंडावंदन केल्यानंतर कार्यक्रम स्थळी माँ माणिका देवी व सर्व थोर महात्म्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले आणि अफाट संख्येने उपस्थित माना समाजबांधवांना विविध विषयांवर संबोधित केले.

.          दरम्यान, समस्त माना समाजाच्या वतीने आमदार भांगडिया यांचे आगमनाप्रसंगी जेसीबीने पुष्पवृष्टी करत, वाजतगाजत मिरवणूक काढून, पारंपारिक आदिवासी लोकनृत्याने, भव्य पुष्पहाराने व उपस्थित माता भगिनींनी उत्स्फूर्तपणे औक्षण करत जंगी स्वागत केले. मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार बंटीभाऊंचा माँ माणिका देवीची प्रतिमा, पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून जाहीर सत्कार करण्यात आला.

.          या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष राजू झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, चिमूर कृ.उ.बा. समिती सभापती मंगेश धाडसे, माजी सभापती पं.स. चिमूर प्रकाश वाकडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा माया नन्नावरे, भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष एकनाथ थुटे, भाजपा अनुसूचित जमाती आघाडी तालुकाध्यक्ष गजानन गुडधे, भाजपा युवा नेते समीर राचलवार, माजी पं.स. सदस्य अजहर शेख, सरपंच्या गट ग्रा.पं. खडसंगी प्रियंका कोलते, उपसरपंच गट ग्रा.पं. खडसंगी संदीप भोस्कर, अध्यक्ष ग्रामदर्शन शिक्षण मंडळ चंद्रपूर अशोक रणदिवे, तंटा मुक्ती समिती खडसंगी अध्यक्ष वेणूदास बारेकर, माजी नगरसेविका न.प. चिमूर भारती गोडे, ज्ञानेश्वर मेश्राम, प्रभाकर दोडके, डॉ. श्रीकांत रणदिवे, रामचंद्र एन. श्रीरामे, वासुदेव प. श्रीरामे, प्रा.डॉ. दिनकर चौधरी, पुरुषोत्तम गायकवाड, रंजीत सावसाकडे, प्रा. गुणवंत वाघमारे, डॉ. हेमंत जांभुळे, डॉ. गोपीचंद गजभे, परसराम नन्नावरे, मनोहर रणदिवे, भिमराव दडमल, नानाजी श्रीरामे, नितेश दोडके, अरुणा नन्नावरे, सुशील नन्नावरे, मंगला गोरवे, शिल्पा गेडाम व अन्य मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन सुशीला चौखे, प्रास्ताविक राकेश जीवतोडे, तर आभार प्रदर्शन रोहित जांभूळे यांनी केले.