ठाणेदार अमित कुमार पांडे यांचे महिला सुरक्षा विषयक मार्गदर्शन
माजरी : येथील स्थानिक परिसरात वॉर्ड क्रमांक 6 मध्ये येत असणाऱ्या जगनाथ महाराज येथे लोक वर्गानीतून विदेही सद्गुरु जगन्नाथ बाबा यांचा प्राणप्रतिष्ठा वार्षिक द्विदिवशीय सोहळा संप्पन्न झाला.
. गुरुवार दि. 20 फेब्रुवारी ला सायंकाळी 6 वा. घटस्थापना केले रात्रौ 8 वा. सांस्कृतिक कार्यक्रम या कार्यक्रमात उत्कृष्ठ घेण्यात आला. त्यामध्ये प्रथम पुरस्कार वेदु नागतुरे, द्वितीय पुरस्कार निधी बोढाले, तर तृतीय पुरस्कार चैताली मेश्राम हिला देण्यात आले. आणि विशेष प्रोसाहन पर बक्षीस प्रीती दातारकर यांचा संच कडून देण्यात आले. नृत्य परीक्षक म्हणून अनंता हजारे, चैतन्य कोहळे, यांनी काम पाहिले रात्रौ 11 वा. जागृती भजन गावातील महिला व पुरुष भजन मंडळ माजरी येथील संचानी केले. शुक्रवार दि 21 फेब्रुवारी ला पालखी व दिंडी यात्रा काढण्यात आली. यामध्ये बाहेरील भजन मंडळांचा हभाग होता. पालखीत सहभागी भजन मंडळ पाटाळा, राळेगाव, मनगाव, नागलोन, विसलोन, कुचना, शेंबळ, एकोना, चालबर्डी, नंदोरी, खापरी, थोराणा इत्यादी सर्व पुरुष व स्त्री भजन मंडळं यांनी गावातील सर्व परिसरात दिंडी व पालखी मिरवणूक काढली. दरम्यान 1:30 वाजता जनजागृती मार्गदर्शन पर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माजरी पोलीस स्टेशन चे निरीक्षक अमित कुमार पांडे व मनसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार होते. तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले कर्मवीर विद्यालय शिक्षण प्रसारक मंडळ वरोरा चे अध्यक्ष डॉ. उत्तमराव झाडे हे होते. प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य अमृता सुर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सूर, दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी चैतन्य कोहळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
. सत्कार मूर्ती माजरी ठाणेदार अमितकुमार पांडे यांनी जनसेवा हितार्थ सायबर क्राईम कसे होतात व याबाबत नागरिकांनी कशी सतर्कता बाळगावी याबाबतचे विशेष मगर्गदर्शन केले तसेच महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी राबविलेल्या उपक्रमाचा लाभ घ्यावा व रात्रौ दरम्यान प्रवासात एकटे असल्यास पोलिसांची हेल्पलाईन नंबर वर फोन करून सुरक्षितात बाळगावी या मुद्द्यावर विशेष मार्गदर्शन करत लहान मुलांना जास्त मोबाईल दिल्यास काय अपाय होतात हे सुध्दा त्यांनी आपल्या भाषणातून जनजागृती पर सांगितले.
. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कृणाल टोंगे यांनी तर आभार प्रदर्शन अनंता हजारे यांनी केले. दरम्यान काल्याचे कीर्तन ह.भ.प.स्वाती ठेंगणे (पंढरपूरकर) यांनी केले तर दहीहंडी चा कार्यक्रम सेवानिवृत्त वेकोली कर्मचारी दिलीप चवले यांच्या हस्ते पार पाडला. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता व्यवस्थापन कमेटी विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज माजरी च्या वतीने महाप्रसाद चे वितरण करण्यात आले.
. या कार्यक्रमास यशस्वी पार पाडण्यासाठी हरी सूर, नामदेव टोंगे, बंडू मोहितकर, उद्धव आसुटकर, अमोल अडवे, प्रमोद आस्वले, संतोष देठे, संतोष पिदूरकर, आनंदराव अडवे, सुधाकर वैध्य, सचिन घाणवडे, संजय लोहकरे इत्यादी कमिटी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.