छत्रपती शिवाजी महाराज छायाचित्र स्पर्धा चे पुरस्कार जाहीर

189

कवितेचे घर व विकास ग्रुपचा उपक्रम

वरोरा : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कवितेचे घर शेगाव बु तसेच विकास ग्रुप, शेगांव (बु.), दादापूर, शेगांव (खुर्द) तसेच खेमजई ह्यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र काढण्याची स्पर्धा आयोजीत केल्या गेली. या स्पर्धेत विदर्भातील पहिली ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

.      हा पुरस्कार कवितेच्या घरातर्फे नारायणराव वरभे ह्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केला गेला. पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम व प्रमाणपत्र असे आहे. मान्यवरांच्या हस्ते कवितेच्या घराच्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये गट ‘अ’ मध्ये वर्ग सहावी ते दहावीमध्ये नागपूर येथील तरंग उमेश राऊत हयाचा प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक उमरेड येथील निर्मित अभय लांजेवार तसेच तृतिय क्रमांक शेगाव खुर्द येथील दीप्ती अरविंद लभाने यांना प्राप्त झाला. गट ‘ ब’ मध्ये वर्ग पहिली ते पाचवीमध्ये शेगाव बुद्रूक येथील रुद्र संदीप बोकडे हयाचा प्रथम क्रमांक आला, द्वितीय क्रमांक शेगाव खुर्द येथील नैतिक प्रशांत क्षीरसागर तसेच तृतिय क्रमांक शेगाव बुद्रूक येथील हुजेफा फातेमा शकील पठाण यांना प्राप्त झाला.

.    कवितेच्या घराच्या या उपक्र‌मामुळे विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची गोडी लागण्यास मदत झाली तसेच महापुरुषाची चित्रकलेच्या माध्यमातून ओळख झाली.या उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता किशोर पेटकर, श्रीकांत पेटकर, डॉ. प्रमोद नारायणे, डॉ. संदीप भेले, विकास जवादे, विनोद वरभे, निखिल आत्राम तसेच विकास ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.