बांधकाम अपूर्ण मात्र दारू विक्री सुरू

40
  • रत्नमाला चौकातील ते बार कि वाईन शॉप ?
  • दारूविक्री दुकानाला फलकच नाही
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाची भुमिका संशयास्पद

चंद्रपुर
.           चंद्रपुर नागपुर महामार्गावरील वरोरा येथील रत्नमाला चौकात गोल्डन लाज चे बांधकाम सुरू आहे . या इमारतीला बियर बार चे फलक लावण्यात आले नाही मात्र या इमारतीतून दारू विक्री सुरू आहे . ही दारू विक्री वैद्य की अवैद्य हे मात्र अद्यापही कळले नसून या इमारती पासून काही अंतरावर असलेल्या सर्विस रोडच्या नाली वर एक फलक लागला आहे त्यात बारचे काम चालू असल्यामुळे बार 15 दिवस बंद राहील. असे लिहिले आहे त्यामुळे नेमका बार कुठे आहे हे अद्यापही संभ्रमात आहे .
.           मुंबई दारूबंदी कायदा १९४९ च्या अंतर्गत येणारे विदेशी दारू नियम १९५३ नुसार अर्जदाराने विहित कागदपत्राची व तत्सम अधिकार्‍यांची पूर्व परवानगी घेऊन मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यास शासन परवानगी देत असते . मात्र वरोरा तालुक्यातील मौजा बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत नव्याने परवाना कक्ष अनुज्ञती मंजूर झाल्याचे विश्वसनीय माहितीनुसार कळते . सदर ची अनुज्ञती ही नागपुर चंद्रपुर महामार्गा जवळील वरोरा शहरलगत रत्नमाला चौक या परिसरात सुरू झालेली आहे . परंतु संबधित अनुज्ञती धारकाने इमारतीचे बांधकाम सुरू असताना व बियर बार चा कोणताही फलक न लावता अधिकार्‍यांना हाताशी धरून व संगनमत करून जिल्हाधिकारी चंद्रपुर यांची दिशाभूल करून उक्त अनुज्ञती मंजूर करून घेतली आहे . तरी याबाबत वरिष्ठ स्तरावर योग्य चौकशी करून संबधित अनुज्ञतीधारकाची अनुज्ञती रद्द करण्याची कारवाही करून प्रस्तावित चौकशी अहवाल सादर करणार्‍या अधिकार्‍याची सुद्धा चोकशी करून कारवाही करावी अशी मागणी होत आहे .

वैद्य बार परवाना चालकांमध्ये तीव्र संतोष
राज्य उत्पादन शुल्क यांनी विहित केलेल्या नकाशाप्रमाणे आणि निकषा प्रमाणे बांधकाम पूर्ण होण्याअगोदरच व बियर बार चा फलक न लावताच प्रिंट रेट ने दारूविक्री सुरू आहे . याबाबत संभ्रमण असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे . तालुक्यातील वैद्य बार परवाना चालकांमध्ये तीव्र संतोष दिसत आहे .