सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव

36
  • हातची पिके निसटल्याने शेतकर्‍यांवर संकट
  • कोणतेही निकष न लावता सरसकट आर्थिक मदत द्या
  • भटाळीचे सरपंच सुधाकर रोहनकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना  निवेदन

 

भद्रावती

सोयाबीन पिकाला नगदी पीक म्हणून ओळखल्या जाते . त्यामुळे भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी  सोयाबीन ची लागवड करतात . यावर्षी पाऊस उशिरा आल्याने शेतकर्‍यांनी सोयाबीन ची लागवड उशिरा केली .मात्र सोयाबीन ला पोषक असा पाऊस आल्याने यावर्षी सोयाबीन चे भरघोष पीक होणार अशी आशा असताना अचानक  सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्या अख्खे पिकच करपू लागले . यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे .  शासनाने तात्काळ शेतात जाऊन पंचनामे करून सोयाबीन पिकासाठी कोणतेही निकष न लावता सरसकट आर्थिक मदत देण्यासंदर्भात  उपविभागीय अधिकारी वरोरा  लंगडापुरे , भद्रावती तहसीलदार अनिकेत सोनवणे . कृषी अधिकारी झाडे  यांना भटाळी ग्रामपंचायत सरपंच सुधाकर रोहणकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले .

यावेळी भटाळी ग्रामपंचायत सरपंच सुधाकर रोहणकर,  सरपंच विजय खांगार, उप सरपंच मंगेश भोयर, सरपंच मनीषा रोडे. सरपंच संगीता देहाळकर, सरपंच मनीषा तुरंकार, सरपंच मोहित लभाने, सरपंच स्वप्नील  पंतवाने,  सरपंच प्रदीप महाकुळकर,शेतकरी विलास सातपुते, विलास परचाके, गजानन उताणे. विजय येरगुडे,उपस्थित होते.