अध्यक्षपदी निळकंठ आमटे तर सचिवपदी अरविंद ढवस
वरोरा : ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती तालुका वरोरा ची सरस्वती मंदिर बोर्डा चौक वरोरा येथे नुकतीच सभा पार पडली. यात दरम्यान नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी निळकंठ आमटे तर सचिवपदी अरविंद ढवस यांची नियुक्ती करण्यात आली.
. या सभेला ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती चे जिल्हा अध्यक्ष परशुराम तुंडूलवार, जिल्हा सचिव प्रकाश राठोड, जिल्हा कोषाध्यक्ष आदे, गड्डमवार, ताजने होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अरूण जमदाडे ह्यांनी व जिल्हा कार्यकरणीचे पदाधिकरी यांनी सभेला पेन्शन बाबत सविस्तर तसेच उपयुक्त असे मार्गदर्शन केले. सभेत तालुका अध्यक्ष निळकंठ आमटे यांनी मागील वर्षाचा लेखा, हिशोब मांडला. त्यास सर्वांनी मंजुरी दिली. व पुढील वर्षा करीता नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली.
. यात अध्यक्ष म्हणून निळकंठ आमटे, उपाध्यक्ष मेघश्याम ताजने, सचिव अरविंद ढवस, कार्याधक्ष प्रभाकर ठेंगणे, सहसचिव विलास जोगी, कोषाध्यक्ष दिलीप करलुके, संघटक अरूण गायकवाड, सहसंघटक धनराज ठमके, प्रसिध्दी प्रमुख राजु वानखेडे, सदस्य मारोतराव मगरे, सुधाकर बोरकर, महिला प्रतिनिधी सुनिता माथनकर, प्रतीमा जांभूळकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
. सभेच्या आयोजनाकरिता मेघाश्याम ताजने, प्रभाकर ठेंगणे यांनी परिश्रम घेतले. सभेचे संचालन अरविंद ढवस यांनी केले तर आभार मारोतराव मगरे यांनी मानले.