Home चंद्रपुर जिल्हा विशेष विसापूर हद्दीत शासकीय जागेवरचे बांधकाम साहित्य जप्त

विसापूर हद्दीत शासकीय जागेवरचे बांधकाम साहित्य जप्त

6

तहसील कार्यालयाची धडक कारवाई

ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी केला होता पंचनामा

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात विसापूर ग्रामपंचायत हद्दीत भिवकुंड मधील सर्वे क्रमांक १0६ चे जागेवर येथील एका भाजपाच्या कार्यकर्त्याने अनधिकृतपणे बांधकाम साहित्य जागा बळकावण्याच्या हेतूने जमा केले होते. याचा पंचनामा करून ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी अहवाल तहसीलदार रेणुका कोकाटे यांना सादर केला. या आधारे आज गुरुवारी २१ मे रोजी धडक कारवाई करून तहसील प्रशासनाने बांधकाम साहित्य व एक नादुरुस्त वाहन जप्त केल्याची कारवाई केली. यामुळे अवैधरित्या बांधकाम साहित्य ठेवणाऱ्यांत एकच खळबळ माजली आहे.

.      बल्लारपूर तालुक्यातिल विसापूर हद्दीत भिवकुंड मधील सर्वे क्रमांक १0६ मध्ये 3.84 हेक्टर आर जमीन पैकी एका ठिकाणी घरांचे बांधकाम करून असणाऱ्यांना पट्टे मिळावे,म्हणून अर्ज सादर केले आहे. याची तपासणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी आरती दुलत गेली असता तेथील नागरिकांनी अंगणवाडी साठीच्या जागेवर भाजपाचे कार्यकर्ते व माजी सरपंच भारत ऊर्फ भारद्वाज उत्तम जीवने यांनी अनधिकृतपणे बांधकाम साहित्य ठेवले असल्याचे आढळून आले. तसा अहवाल ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी तहसीलदार रेणुका कोकाटे यांना सादर केला.

.      बांधकाम साहित्य ठेवून सदर शासकीय भूखंड बळकावण्याच्या हेतूने जागेचा वापर करत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली.तो भाजपाचा कार्यकर्ता असून जे. सी. बी. वाहनाने खोदकाम करत असल्याचे दिसून आले.हा गंभीर प्रराची बल्लारपूर तहसील प्रशासनाने तातडीने तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी नायब तहसिलदार महेंद्र फुलझेले व नायब तहसीलदार अजय मल्लेरवार, महसूल अधिकारी आरती दुलत यांच्या पथकाने धडक कारवाई करुन शासकीय जागेवरचे बांधकाम साहित्य जप्त केले.

error: Content is protected !!