Home सामाजिक विसापुरात चिमुकलीचे शाही स्वागत

विसापुरात चिमुकलीचे शाही स्वागत

5

वंशाच्या दिव्याची व्याख्या बदलत लेकीची बैलगाडीतून काढली मिरवणूक !

क्षीरसागर व येवले कुटुंबाचा कौतुकास्पद उपक्रम

‘मुलगा-मुलगी एक समान’ संदेश देत जोपासली सामाजिक बांधिलकी

बल्लारपूर : सामाजिक जीवनात मुलीचा जन्म परक्याच धन समजण्याची प्रवृत्ती आहे. परिणामी वंशाचा दिवा म्हणून मुलाच्या जन्माचे कोडकौतुक केले जात आहे. यातून लिंग निदान चाचणी करून कच्च्या कळ्यांना गर्भातच मारून टाकले जात आहे. यामुळे समाजात लिंगोत्तर प्रमाण घटले आहे. या प्रथेला फाटा देत बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावात मुलीच्या जन्माचे स्वागत बैलगाडीतून मिरवणूक काढून करण्यात आले. अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त करण्याच्या प्रसंगाची गावात चर्चा होत आहे. विसापूर येथील क्षीरसागर व येवले कुटुंबाच्या प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

.      चंदन व प्रतीक्षा येवले यांच्या संसार वेलीवर कन्यारत्नाने जन्म घेतला. याचा आनंद अनोख्या पद्धतीने व्यक्त करण्याची संकल्पना त्यांनी आखली. मुला मुलीच्या जन्माचे अंतर करायचे नाही. मुलगा, मुलगी एक समान ,असा संदेश देण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला. याला क्षीरसागर व येवले कुटुंबियांनी होकार दिला. माहेरून घरी आणताना मुलीच्या जन्माचे स्वागत अनोख्या व वेगळ्या पद्धतीने करण्याचे योजले.ही योजना चंदन व प्रतीक्षा येवले यांनी शुक्रवारी प्रत्यक्षात आणली.

.      प्रतीक्षा ही प्रसुतीसाठी येथील तुकडोजी महाराज चौक परिसरातील वडील सदानंद क्षीरसागर यांच्या घरी गेली होती. तिला कन्यारत्न झाले. प्रथेनुसार सासरचे कुटुंब टोमणे मारतील, असी मनोभावना प्रतीक्षा होती. मात्र पती चंदन ची साथ तिला भक्कम मिळाली. माहेरून घरी जाताना, आपला आनंद द्विगुणित केला. बैलगाडीला आकर्षक सजावट केली. कृषी संस्कृतीचे दर्शन घडवून आणले. सजविलेल्या बैलगाडीतून चंदन, त्याची पत्नी प्रतीक्षा व नवजात कन्या रत्नाला बसवले. वाजतगाजत मिरवणूक काढून सासरी आणण्यात आले. हा अनोखा प्रसंग विसापूरकरांनी पहिल्यांदा अनुभवला. मुलीच्या जन्माचे आदरातिथ्य वेगळेपण दर्शविणारे ठरले. मुलगा, मुलगी एक समान याचा संदेश देण्याचा प्रसंग कौतुकास्पद ठरला. याची गावात एकच चर्चा होत आहे.

error: Content is protected !!