‘राष्ट्र प्रथम’ तत्त्वाचे प्रतीक म्हणजे महामहिम राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची सेवा – आ. सुधीर मुनगंटीवार

5

आ. मुनगंटीवार यांची केरळचे महामहिम राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याशी सदिच्छा भेट

महाराष्ट्र-गोवा-केरळ यांच्यातील स्नेहसंबंध दृढ होण्याच्यादृष्टीने प्रेरणादायी संवाद

तिरुअनंतपुरम : केरळच्या राज्य लॉटरी यंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी दौऱ्यावर असलेले राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवार, दि. १९ मे रोजी तिरुअनंतपुरम येथील राजभवनात केरळचे महामहिम राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत शासन व्यवस्थेतील नवोन्मेषी प्रयोग, राज्यसेवेतील मूल्याधिष्ठित अनुभव तसेच महाराष्ट्र-गोवा-केरळ यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंधांवर सविस्तर चर्चा झाली.

.      राजभवनात झालेल्या या भेटीत महामहिम राज्यपाल आर्लेकर यांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल आ. मुनगंटीवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी आ. मुनगंटीवार म्हणाले, “बिहार, हिमाचल प्रदेश आणि आता केरळ या तिन्ही राज्यांत महामहिम राज्यपाल म्हणून आर्लेकर यांनी दिलेली सेवा म्हणजे ‘राष्ट्र प्रथम’ या तत्त्वाची जिवंत साक्ष आहे.” गोव्याचे सुपुत्र असलेले आर्लेकर यांचे महाराष्ट्राशी असलेले भावनिक व सांस्कृतिक नातेही उल्लेखनीय असल्याचे त्यांनी यावेळी त्यांनी नमूद केले.

.      ही सदिच्छा भेट सौहार्द, परस्पर सन्मान आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी ठरली. महाराष्ट्र व केरळ यांच्यातील सहकार्याच्या नव्या शक्यता या संवादातून निश्चितच आकार घेतील, असा विश्वासही आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.