किशोर डुकरे यांची मागणी
वरोरा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी 90 दिवसाचे बांधकाम क्षेत्रातील काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. ग्रामीण भागात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहे.
. गाव पातळीवर ग्राम विकास मंडळाने 2017 मध्ये काढलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक 90 दिवसाचे प्रमाणपत्र देत होते. मात्र ग्रामसेवक मध्ये सध्या संभ्रम अवस्था दिसून येत असून ग्रामविकास विभागाने त्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देश करावे बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या कुठलाही कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये त्यामुळे त्यांना 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी केली आहे.