पंचायत राज दिन व सरपंच-सदस्य मेळाव्यात अनेकांचा सत्कार

1

कुचना : पंचायत समिती भद्रावती व ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्या सहकार्याने जेके पॅलेस भद्रावती येथे तालुकास्तरीय पंचायत राज दिन व सरपंच-सदस्य मेळावा नुकताच पार पडला यावेळी ग्रामपातळीवर उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

.     या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आ. करण संजय देवतळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे प्रकल्प संचालक गिरीश धायकुडे, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, सहा. गट विकास अधिकारी डॉ. बंडु आकनुरवार, सरपंच संघटनेचे प्रदीप महाकुलकर, मनीषा रोडे, छाया जंगम, शंकर रासेकर, बंडू नन्नावरे, संघर्ष बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष धम्मराज नवले,गटशिक्षणाधिकारी डॉ प्रकाश महाकाळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय आसुटकर, उप अभियंता चंद्रशेखर गायकवाड, रंजीत रामटेके, पशुधन विकास अधिकारी डॉ.बहानिया,बाल विकास प्रकल्प अधिकारी स्नेहल चार्लॅकर,ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश खरवडे आणि तालुकाध्यक्ष राजेंद्र गणवीर होते.

.      कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून करण्यात आली. दरम्यान कार्यक्रमात वर्षभरात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, आर आर पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार ग्रामपंचायत सागरा, चंदनखेडा, ढोरवासा, शंभर टक्के करवसुली बद्दल ग्रामपंचायत सागरा, मानोरा, चालबडीॅ (रै), जेनाला व जिल्ह्य परिषदेकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी भरत राठोड, हनुमान इनामे व माझी वसुंधरा अभियान बद्दल ग्रामपंचायत माजरीच्या सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांना आमदार व प्रमुख अतिथी यांचे हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आला.
यावेळी आ. करण देवतळे यांनी पंचायत राज दिनी सरपंच-सदस्य मेळावा आयोजित केल्यामुळे शासनाचा ध्येय धोरणाची माहीती होत असल्याचे सांगुन देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे असल्याचे सांगितले. गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी पंचायत राज दिनी सरपंच, ग्रा. अ. मेळावा आयोजित करून ग्रामपंचायत ध्येय धोरणाची प्रश्न मंजुषा आयोजित करून सशक्त ग्रामपंचायत करण्याचा मानस आहे. पंचायत समिती व सात ग्रामपंचायत आयएसओ झाल्याचे मनोगतात व्यक्त केले.

.     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा.गट विकास अधिकारी डॉ. बंडु आकनुरवार संचालन विस्तार अधिकारी प्रणाली भागवत, ग्रा.अ.अश्विन पेटकर, आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर यांनी केले. यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी प्रकाश पारखी, मनरेगा समन्वयक सुरज खोडे ,ग्रा.अ. संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गणवीर, विजय पचारे, भरत राठोड, दयानंद तिडके व तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समितीतील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते