चंद्रपूर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात एमटेक च्या अंतिम वर्षात शिकणारी साक्षी नरेंद्र जिवतोडे हिने शेती क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याकरिता तरुणांसाठी कृषी अभियांत्रिकी शिक्षणावरील परिसंवाद हा आंतरराष्ट्रीय स्तराचा परिसंवाद झाला यात साक्षीने सहभाग घेतला होता. त्यात तिची निवड झाली असून तिला युवा महिला वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित केले आहे. पहिले आंतरराष्ट्रीय कृषी संमेलन परभणी येथील कृषी विद्यापीठात झालेल्या संमेलनात हा पुरस्कार देण्यात आला आहे.
. भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील प्रगतशील शेतकरी तथा शेतकरी उत्पादक कंपनी चे जिल्हाध्यक्ष नरेंद्र जिवतोडे यांची मुलगी साक्षी नरेंद्र जिवतोडे बीटेक फुड टेक्नॉलॉजी हे शिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून पूर्ण केले. तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ती एमटेक फुड टेक्नॉलॉजी च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. साक्षीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे शेती क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी तरूणांकरिता कृषी अभियांत्रिकी शिक्षणावर दि. 12 ते 14 नोव्हेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय स्तराचा परिसंवाद झाला त्यामध्ये साक्षीने सहभाग घेतला होता. त्यात तिची निवड यंग वुमन साईनटिस्ट अवॉर्ड या करिता झाली. हा अवॉर्ड पहिले आंतरराष्ट्रीय कृषी संमेलन परभणी येथील कृषी विद्यापीठात झालेल्या संमेलना दरम्यान तिला देण्यात आला. तिला मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे डॉ. विजया पवार, डॉ. राजेश क्षिरसागर याचे विशेष मार्गदर्शन लाभले. असून तिच्या यशाचे श्रेय प्राध्यापक, आई वडील यांना दिले असून सर्व स्तरावरून तिचे अभिनंदन होत आहे.
विशेष कार्यामध्ये सहभाग
7 ते 10 डिसेंबर 2023 मैसूर (कर्नाटक) येथे झालेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय अन्न अधिवेशनामध्ये सहभाग व सादरीकरण.
पणजी (गोवा) येथे आठव्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये (24 ते 26 फेब्रुवारी 2025) शास्वत शिक्षण पर्यावरण आणि शेतीमधील अत्याधुनिक संशोधन या विषयावरती झालेल्या परिषदेमध्ये सहभाग.
विशेष लेसन
- कार्यात्मक अन्न आणि न्याट्रासिडीकल, अन्न जैव तंत्रज्ञान ह्या विषयावर विशेष प्रसिद्ध लेसन.
- जेवणाच्या ताटापासून कामकऱ्यांपर्यंत पोषण फिटनेस ला आकार देणे.
- पपई प्रथिने, किटक आणि वनस्पती आधारीत मास.
- औषधी वनस्पती जिरे उपयोग.
- अन्न सुरक्षा व गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली.
विशेष संशोधन
- हळदीचे लोणचे इम्युनिटी बुस्टर गुळ जांभळचे जंभासव
- पालक मेथी