नांदगाव शेतशिवारात वाघाची दहशत

32

वाघाच्या हल्ल्यात तीन शेतकरी जखमी

ब्रम्हपुरी : तालुक्यातील नांदगाव आणि आजूबाजूच्या परिसरात उन्हाळी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.त्यामुळे त्या गावातील बरेच शेतकरी धानाला पाणी देण्यासाठी व शेतीची निगराणी करण्यासाठी जात असतात. मात्र काही दिवसापासून नांदगाव शेतशिवारात वाघाचा वावर असून आतापर्यंत 3 शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला करून जखमी केले. या घटनेमुळे शेतकरी भयभीत झाले आहे.

.      काही दिवसा आधी नांदगाव येथील शेतकरी गोवर्धन डांगे हे आपल्या शेतीवर धानाला पाणी देण्यासाठी गेले असता त्याचेवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली ही घटना ताजी असताना आज पुन्हा वाघाने हल्ला करून तीन शेतकऱ्यांना जखमी केल्याची घटना आज सकाळी ७.३० वाजता नांदगाव येथे घडली.

.        ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव आणि आजूबाजूच्या परिसरात उन्हाळी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे त्या गावातील बरेच शेतकरी धानाला पाणी देण्यासाठी व शेतीची निगराणी करण्यासाठी जात असतात. काही महिन्यांपासून या परिसरात वाघाचा वावर असल्याचे निदर्शनास आले.मागील महिन्यात शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या गोवर्धन डांगे या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला मात्र डांगे यांनी वाघाशी हिमतीने सामना केल्याने वाघ पळून गेला त्यात डांगे गंभीर जखमी झाले होते.आज सकाळी ७.३० च्या दरम्यान नांदगाव येथील दोन शेतकरी आपल्या पिकाला पाणी देण्यासाठी एक शेतकरी शेळ्यांना चारा आणण्यासाठी गेले असता बिबट वाघ लांडग्यांच्या मागे शिकार करण्यासाठी धावत होता अशातच त्याची लक्ष शेतीवर व जवळपास असलेल्या तीन शेतकऱ्यावर गेली आणि त्यांनी एका पाठोपाठ तिघांवरही हल्ला केला मात्र प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला त्या वाघाच्या हल्ल्यात ओनम प्रकाश सोंदरकर (18), देवानंद नानाजी पिल्लारे (45), प्रफुल राजेश्वर सहारे (27) राहणार नांदगाव हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नांदगाव शिवारात वाघाची दहशत निर्माण झाली असून शेतकरी आपल्या शेतातील पिकाची पाहणी व अन्य कामासाठी जाण्यास घाबरत असल्याने वनविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.