शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने रामभक्तांचा सहभाग
नेरी : श्रीराम जन्मोत्सव कमिटी नेरी च्या वतीने प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करून मोठया उत्साहात श्रीरामाची शोभायात्रा संपूर्ण शहरात दिंडीत डीजे, ढोल ताश्या च्या निनादात अघोरी ग्रूप उज्जेन यांच्या कलाकृतीच्या सादरीकरनात आणि श्रीरामाच्या प्रतिकृती सहित हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत प्रभू श्रीराम यांच्या जयघोषाने संपूर्ण नेरी नगरी दुमदुमली जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सुटला.
. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी श्रीराम जन्मोत्सव कमिटी नेरी च्या वतीने दि 6 एप्रिलला श्रीराम जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संपूर्ण नेरी शहराला भगव्या पताका ध्वज तोरण आदींनी सजवून भगवेमय केले होते. या सोहळ्याला विधिवत श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीराम जन्मावर प्रबोधन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. यानंतर प्रभू श्रीराम यांची भव्य अशी मिरवणूक पंढरीनाथ देवस्थान पेठ वार्ड नेरी येथून निघाली. या मिरवणुकीत दिंडी, ढोल ताश्या, डिजे श्रीरामाच्या प्रतिकृती तर लहान बालकांनी श्रीराम लक्षण आणि सितामाता हनुमान यांची वेशभूषा साकारलेली झाक्या समावेश होता. तर सर्वांना विशेष आकर्षित करणारी उज्जेन येथील अघोरी ग्रुप यांच्या कलाकृतीचे सादरीकरण आदी सह मिरवणुकीत सहभाग होता. सदर कार्यक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी भेट दिली. आणि विधिवत श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून शांततेत मिरवणूक काढून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
. प्रभू श्रीरामाच्या शोभायात्रा मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने रामभक्त भाविक नागरिक बालगोपाल यांचा सहभाग होता. नाचत गाजत कलाकृती चे सादरीकरण करीत रंगबेरंगी प्रकाशझोतात मोठया जल्लोषात श्रीरामाच्या जयघोषात मिरवणूक संपूर्ण शहरातून फिरून गुरुदेव सेवा मंडळ नेरी येथे मिरवणुकीची सांगता झाली. सदर श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी श्रीराम जन्मोत्सव कमिटी नेरी यांनी अथक परिश्रम घेतले.