महसूल विभागाने दखल घेण्याची गरज
नेरी : कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने शेतशिवारात पांदण रस्ते निर्माण केले मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तालुक्यात अनेक ठिकांनी शेतकऱ्यांच्या शेतातील पादन रस्त्याने अवैध रेतीची जड वाहतूक होत असल्याने या पांदन रस्त्याची वाट लागली आहे. तेव्हा शासनाच्या महसूल विभागाने याची दखल घेऊन रेती तस्करी थांबवावी किंवा रीतसर रेती घाट लिलाव करावे आणि रहदारी करण्यास मुख्य मार्गाने परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी संघटना नेरी विभागाचे अध्यक्ष काशिनाथ चांदेकर यांनी केली आहे.
. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध योजना आखल्या आहेत. त्यातीलच पांदण रस्ता ही महत्वाची योजना आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वाहन गेल्यास पीक घरापर्यंत अथवा बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे सोपे होते. तसेच शेतातील इतर कामांसाठी साहित्य नेण्यासही सुलभ होते. मात्र सदर पांदण रस्त्यांने दिवसा रात्रौला चालणाऱ्या जड वाहतुकीमुळे पादणं रस्त्याची वाट लागली आहे. पायदळ चालणे सुद्धा जिकरीचे झाले आहे.बैलगाडीही चालविणे अवघड झाले आहे.रस्तावर तीन चार फूट खोल खड्डे पडले आहेत.असेच जर राहिले तर पुढील शेती हंगामात शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
. मजूर टंचाईने यांत्रिकी पद्धतीने शेती करावी लागते.यासाठी शेतात ट्रॅक्टर व इतर यंत्र सामुग्री नेण्यासाठी बारमाही पक्क्या रस्त्याची गरज असते. महसूल विभाग, कृषी विभाग आणि खासगी कंपन्या विकासाचे स्वप्न दाखवितात. परंतु पांदण रस्त्यावर दिवस रात्रौला चालणाऱ्या वाहतुकीला कुणीही बोलत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी पुढाकाराची गरज आहे. तेव्हा महसूल विभागाने यांची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी काशीनाथ चांदेकर यांचा सह शेतकरी वर्गाने केली आहे.