मनपा प्रशासनाच्या विरोधात जनतेचा आक्रोश !
चंद्रपूर : चंद्रपुर महानगरपालिकाच्या वेळकाढू धोरणाने चंद्रपुरकर चांगलेच वैतागले आहे. चंद्रपुर शहरात विविध समस्यांचा डोंगर असतांनाही महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे स्थानिक गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणात एक दिवशीय अन्नत्याग व धरणे आंदोलन करण्यात आले.
. चंद्रपूर शहरात काही वर्षांपूर्वी मल निसारण योजना टाकण्यात आली ती पूर्णपणे अयशस्वी ठरली असून पुन्हा नव्याने निविदा काढून मल निसारण योजना टाकण्यात येत आहे या शिवाय अमृतजल योजना आधीच पूर्ण न करता नव्याने पुन्हा अमृत जल योजना 2 चे काम सुरू करण्यात आले. शहरातील अभ्यंकर व टागोर शाळा बंद करण्यात आल्या असून त्या ठिकाणी राहुल देवतळे यांनी अभ्यासकेची मागणी अनेकदा केलेली होती. तरी प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. जन्म मृत्यू दाखल्यासाठी सर्वसामान्यांना टॅक्स पावतीची अट लावण्यात आली.
. या सर्व योजनेचे काम सुरू असताना चंद्रपूरातील काही रस्त्यांचा बट्ट्याबोळ पण झालेला आहे अशा एक नाही तर अनेक समस्यांना घेऊन शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांच्या नेतृत्वात व माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात आज अन्न त्याग व धरणे आंदोलन करुन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. महापालिकेनी आता जर या मागण्यां व समस्यांकडे दुर्लक्ष केले तर या पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदरहु पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर महासचिव सुहास पिंगे, विनोद लभाने, निमेश मानकर, मनोज बंडेवार, संजय वैद्य, मारुती झाडे, परब गिरटकर, लाला गर्गेलवार, संजू जिझीलवार, निल अडगुरवारसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे प्रवीण पडवेकर यांनी आंदोलनात उपस्थिती होवून आपला पाठिंबा दर्शविला. मनपा प्रशासनाच्या विरोधात जनतेत सतत आक्रोश खदखदत आहे. हे मात्र तितकेच खरे आहे.