खासदार धानोरकरांचे रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्देश
वरोरा : नागपूर चंद्रपूर महामार्गावर वरोरा शहराचे हद्दीत आनंदवन चौक व डॉ. कलाम (रत्नमाला) चौकात मंजूर असलेले ट्रॅफिक सिग्नल तात्काळ लावण्याचे निर्देश खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले.
. रस्ता सुरक्षा समितीची बैठक चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी नगरपरिषद वरोराद्वारे पाठविलेल्या सिग्नलच्या प्रस्तावास विलंब होत असल्याचे निदर्शनास आणले. प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी नगरपरिषदेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर योग्य कारवाई करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला असल्याचे सांगितले. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी याबाबत तात्काळ सिग्नल लावण्याबाबत निर्देश दिले. प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी याबाबत लवकर सिग्नल लावण्याचे दृष्टिकोनातून कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
. आनंदवन चौक व डॉ. कलाम चौकात अपघाताची वाढती संख्या बघता या ठिकाणी सिग्नलची मागणी करून, त्याचा पाठपुरावा माजी नगराध्यक्ष टिपले यांनी केला होता. रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षा खासदार प्रतिभा धानोरकर यांचे याबाबत टिपले यांनी आभार व्यक्त केले.