टेमुर्डा येथे वन, वनसंवर्धन जनजागृती, समस्या व समाधान या विषयावर कार्यशाळा

325

वरोरा : अर्थ कन्सहहंसी अँड सर्विसेस, नागपुर, आपण बहुउद्देशीय संस्था नागपुर आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत वनचेतना केंद्र टेमुर्डा येथे वन, वनसंवर्धन जनजागृती, समस्या व समाधान या विषयावर कार्यशाळा दिनांक 11 जानेवारीला पार पडली.

.      या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून इको प्रो संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष बंडू धोतरे, शुअरटेक हॉस्पीटल, नागपुर चे डॉ. भावेश बरडे, डॉ. प्रदिप माकडे, अक्षद वैद्य हे होते. यावेळी मान्यवरांनी वन्यजीव व मानव संघर्ष, आरोग्य, स्थानीक देशी वनस्पतींचे संवर्धन आणि त्यांचे महत्व तर वनांचे संवर्धन व त्यापासुन मिळणारे रोजगार बाबत मार्गदर्शन केले.

.       या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. सौमित्र तिवारे यांनी केले. कार्यक्रमाला वरोरा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध गावातील सरपंच आणि पोलीस पाटील उपस्थित होते. संत तुकडोजी महाराज विद्यालयातील विद्यार्थी आणि परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या पीआरटी सदस्य उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत वृक्ष देऊन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता वनपरिक्षेत्र आधिकारी सतीश शेंडे यांनी केली.