रिकाम्या गावात प्रचार कोणापुढे करायचा
चंद्रपूर : परतीचा पाऊस लांबल्याने सोयाबीन काढणी, हरभऱ्याची पेरणी, कापूस वेचणी, धान कापणी आदी शेतीकामांमध्ये ग्रामीण भागातील मतदार व्यस्त आहेत. त्यामुळे गावात प्रचाराला पोहोचणाऱ्या उमेदवारांचा थेट संवाद मतदारांसोबत होताना दिसून येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात अजूनही इलेक्शन फीवर चढला नसून उमेदवार गावात व मतदार शेतात, अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे.
. बल्लारपूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर व चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात चंद्रपूर शहरवगळता उर्वरित मतदार ग्रामीण भागात आहे. परंतु सद्य:स्थितीत ग्रामीण भागामध्ये धान कापणी, कापूस वेचणी, सोयाबीन काढणी व काढलेले सोयाबीन ओले असल्याने ते सुकवणे, कापसाची वेचणी, हरभऱ्यााची पेरणी, मशागत व फवारणी आदी कामांमध्ये शेतकरी व शेतमजूर व्यस्त आहेत. शेती कामासाठी शेतमजूर भल्या पहाटे शेतावर निघून जातात तर त्यांना गावात परतायला संध्याकाळ होते. त्यामुळे त्यांची व उमेदवारांची भेट होत नाही.
. विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला जोर पकडला असून आता फक्त सहा दिवस शिल्लक आहे. प्रमुख पक्षांचे उमेदवार व काही अपक्ष ग्रामीण भागात पोहोचून प्रचार करताना दिसून येत आहेत. मुख्यतः काही उमेदवार सकाळी ते – सायंकाळी ५ वाजेदरम्यान प्रचाराला गावात पोहोचलेल्या उमेदवारांना ग्रामीण भागात येऊ लागले आहेत.
. डोअर टू डोअर जाऊन प्रचार करताना मतदारांसोबत संवाद साधणे अवघड जात आहे. प्रचारादल्यानही ग्रामीण भागातील बर्याच रस्त्यांवर सुकावत ठेवलेले सोयाबीन व इतर शेतमाल दिसून येतो. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये गावांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार प्रचाराला आल्यानंतर अख्खे गाव रस्त्यावर घेऊन उमेदवारांसोबत संवाद साधताना दिसून येत असे. यावर्षी मात्र सर्वत्र शेतीकामे वेगाने सुरु आहेत. त्यामुळे मतदार मंडळी शेताच्या बांधावरच अधिक दिसून येत आहेत.