जैतापूर येथे आज कार्तिकी एकादशीच्या पर्वावर भव्य कीर्तन महोत्सव

7

राजुरा : मागील एकोणतीस वर्षाची परंपरा कायम राखत जैतापूर येथे श्री गुरुदेव दत्त संप्रदायाच्या वतीने कार्तिकी एकादशीच्या पर्वावर सद्गुरू नामदेव रोकडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (दि. १२) पासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

.      दोन दिवस चालणाऱ्या कीर्तन महोत्सवात (दि. १२) रोज मंगळवारला श्री सद्गुरु माणिक रोकडे महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करून सायंकाळी हभप रामचंद्र गोहोकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दुसऱ्या दिवशी (दि.१३) सकाळी काकड आरती त्यानंतर गावात स्वच्छता अभियान राबवून सकाळी नऊ वाजता श्री सद्गुरु नामदेव रोकडे महाराज यांच्या पालखीची शोभायात्रा दिंडी भजनासहित निघणार आहे. त्यानंतर हभप माणिक रोकडे महाराज यांचे गोपाळ कल्याचे कीर्तन आयोजित केले आहे. संप्रदायाचे दाता अशोकराव साखरकर यांच्या हस्ते दहीहंडी फुटणार असून या कार्यक्रमाला साथ संगत म्हणून भुवन चौधरी, भाऊराव चतुरकर, वसंत बोबडे, सदानंद राऊत, गायक उरकुंडे महाराज हिंगणघाट, मृदुंग वादक समीर महाराज वर्धा, यांची उपस्थिती राहणार आहे.

.      मागील एकोणतीस वर्षापासून जैतापूर येथे श्री गुरुदेव दत्त संप्रदायाच्या माध्यमातून गावात धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून एकोपा टिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. दररोज गावात होत असलेल्या हरिपाठाची सांगता श्री सद्गुरू नामदेव महाराज रोकडे यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वावर साजरी केली जात आहे. या कार्यक्रमाला पदावली भजन मंडळ जैतापुर, गुरुदेव भजन मंडळ मारडा (मोठा), गुरुदेव दत्त भजन मंडळ मारडा (लहान), गुरुदेव भजन मंडळ बोडखा, चैतन्य महिला भजन मंडळ जैतापूर, गुरुदेव भजन मंडळ कवठाळा, गुरुदेव भजन मंडळ हडकुली (तेलंगणा), गुरुदेव भजन मंडळ कोष्टाळा, गुरुदेव महिला भजन मंडळ एकोडी, महिला भजन मंडळ अहेरी, गुरुदेव दत्त महिला भजन मंडळ गोवरी उपस्थितीत राहणार आहे. या महोत्सवाला परिसरातील नागरिक व गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याचे आव्हान मनोहर धांडे, विलास खारकर, मुर्लीधर थेरे, सदाशिव फोफरे, सुधाकर गोरे, संतोष धांडे, शाहींद्र मडावी, सुनील खारकर यांनी केले आहे.