तुळाना किसान जिनिंग मधील घटना
बेजबाबदार जिनिंग संचालकांवर कारवाईची मागणी
राजुरा : जिनींगमध्ये काम करणाऱ्या मजुरांचे दोन लहान चिमुकले जिनिंग परिसरात खेळत असताना जिनिंग मधील कापूस जमा करणाऱ्या मशीनने दोन्ही चिमुकल्याना चिरडल्याची घटना राजुरा शहरापासून सात किलोमिटर अंतरावर असलेल्या तुळाना येथिल किसान जिनिंग मध्ये सोमवारी दि. 11 ला सायंकाळी 5 वाजता घडली. निशा कुमारी समारुराम उईके (२) (मु. छतीसगढ) प्रेम ज्ञानेश्वर कस्टकार (८) (मु. इंदिरा नगर) असे मृतक चिमुकल्यांचे नाव आहे.
. प्राप्त माहितीनुसार राजुरा – असिफाबाद महामार्गावर तुळाना गावाजवळ असलेल्या किसान जिनिंग येथे काम करण्यासाठी काही मजूर कुटुंबासह आले आहे. जिनिंग परिसरातच ते राहतात. पती पत्नी दोघेही जिनिंगमध्ये काम करत असल्याने त्यांची मुले जिनिंग परिसरात खेळतात. नेहमीप्रमाणे मजुरी करणाऱ्या मजुरांचे दोन मुले वडीलांसोबत जिनिंगाच्या आत खेळत होते. याच वेळेला जिनिंगमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कापूस एकत्र करण्यासाठी मशीन सुरू होती. मशीन चालकाला मुल खेळत असल्याचे लक्षात न आल्याने खेळत असलेल्या दोन्ही चिमुरड्यांना चिरडून टाकण्यात आले. यावेळेस निशा कुमारी ही मुलगी जागेवर मृत पावली तर प्रेम याला उपचाराकरता ग्रामीण उप जिल्हारुग्णालय राजुरा येथे आणण्यात आले होते. रुग्णालयात प्रेम ला डॉक्टरांनी मृत म्हणून घोषित केले.
. यावेळेस मृतकाच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त करत जिनिंग संचालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दवाखान्यात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून राजुरा पोलीस घटनास्थळी पोहोचून दोन्ही मृतदेह ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणले. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे. जिनिंग मालक हा राजुरा नगर परिषदेचे माजी सभापती राधेश्याम अडानिया यांची असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाही करण्याची मागणी नागरिक करीत आहे.