विकासकामांतून साधणार गोरगरिबांचा कल्याण

6

ना. सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

गडीसुर्ला गावातील नागरिकांशी साधला संवाद

चंद्रपूर : गडीसुर्ला गावामध्ये अनेक विकासकामे करण्यात आली. या गावाच्या विकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने स्मार्ट अंगणवाडी करिता 20 लक्ष रुपये, वाचनालयाकरिता 50 लक्ष, सामाजिक सभागृहाकरिता 25 लक्ष तर गावातील अंतर्गत रस्त्यासाठी 35 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून दिला. यापुढेही या क्षेत्राचा आमदार म्हणून गडीसुर्ला गावाच्या विकासासाठी पूर्ण शक्तीने काम करेल. जात-पात, धर्म न पाहता विविध विकासाची कामे पूर्णत्वास नेली. आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला. विकासकामांमधून गोरगरिबांच्या कल्याणाचाच ध्यास घेतला आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

.        ना. मुनगंटीवार म्हणाले, मुल येथे कृषी महाविद्यालय, मुल-पोंभुर्ण्यातील धडक सिचंन विहिरी, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून 90 गावांना दत्तक घेण्याचा कार्यक्रम, पाणंद रस्त्याचा बांधणी कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणत 202 कोटी रुपयाचा पिक विमा देवून विदर्भामध्ये चंद्रपूरला प्रथम क्रमांकावर नेत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली काढण्याचे कार्य केले. शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाचे मिळून 12 हजार रुपये देण्यात येत आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. विधानसभेत संघर्ष करत धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून हेक्टरी 20 हजार रुपये धानाचा बोनस मिळवून दिला. येत्या वर्षभरात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

गडिसुर्लाच्या विकासासाठी करण्यात येणारी विकासकामे                                                                                                                पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गडिसुर्ला गामपंचायतीमध्ये अंतर्गत रस्ते, सोलर व्यवस्थेसह पिण्याची पाण्याची योजना, गामपंचायत इमारत नुतनीकरण, स्मशानभुमी बांधकाम, पाणंद रस्ते, गाव जनसंपर्क अभियान, आरोग्य शिबीर, सिचंनाची व्यवस्था, उद्योगासाठी रोजगार नोंदणी, नेत्रचिकित्सा शिबीर, तक्रार निवारण सभा, गाव तिथे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात देण्यात येईल. महाराष्ट्रासारख्या वैभवशाली राज्यात महायुतीचे सरकार येऊन महाराष्ट्रासह जिल्ह्याची प्रगती व्हावी यासाठी जात-पात धर्म न पाहता मतरुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.

काँग्रेसला मतदान म्हणजे विनाशाला आमंत्रण                                                                                                                                     राज्यात समस्यांचा डोंगर उभा करण्याशिवाय काँग्रेसने काहीही केलेले नाही. काँग्रेस कधीच एवढी विकास कामे करू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या खोट्या अपप्रचाराला बळी पडून आपले अमूल्य मत वाया घालवू नये. काँग्रेसला मतदान म्हणजे विनाशाला आमंत्रण असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.