नाल्यावरील दोन मोटरपंप अज्ञात चोरट्यांनी चोरले

17

ऐन हंगामात शेतकरी संकटात

लोहारा नाल्यावरील घटना

नेरी : रब्बी हंगामातील शेतपिकांना पाणी देण्यासाठी नाल्यावर लावण्यात आलेल्या दोन मोटरपंप अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्याची घटना चिमुर तालुक्यातील बोथली लोहारा मार्गावरील नाल्यात घडली.यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.

.      प्राप्त माहितीनुसार बोथली येथील लोहारा नाल्यावर दोन्ही बाजूला शेती असून नाल्यातील पाण्याने मागील अनेक वर्षांपासून सिंचन केले जाते. यासाठी मोटरपंप च्या सहाय्याने पाणी नाल्यातून काढले जाते. अनेक वर्षांपासून सदर पंप सुरळित होते. मात्र दि 7 नोव्हेबंर च्या रात्री अज्ञात चोरट्यानी शंकर घरत तसेच आणखी एका शेतकऱ्याचे मोटरपंप चोरून नेले. ह्या घटनेने शेतकऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना शुक्रवारी सकाळी उघडीस आली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पुढील हंगाम कसा करावा हा सुद्धा प्रश्न उभा टाकला आहे.

.      कारण दोन्ही शेतकरी अल्पभूधारक असून मागील पुराच्या पाण्याने त्यांचे पीक वाहून गेले होते. त्यांनी इकडून तिकडून बियाणे पर्हे जमवून रोवणी केली होती. या घटनेने त्यांच्यावर व कुटूंबावर आघात झाला आहे. तेव्हा प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन त्यांना मदत करावी तसेच पोलीस विभागाने त्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.