बैलपोळ्यामध्ये 40 शेतकरी बांधवाना फळझाडाचे वाटप

71

सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांचा अनोखा उपक्रम

वरोरा : बैलपोळ्याचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांनी तालुक्यातील बोर्डा ग्रामपंचायतीत अंतरभूत सुरला या गावात 40 शेतकरी बांधवाना फळझाडांचे वाटप केले आहे. शेती व्यवसायासोबत जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी बागायतदार शेती करून उत्पन्न वाढवावे अशी कल्पना नागापूरे यांनी मांडून ती सत्यात उतरविली. नागापुरे यांच्या अनोख्या उपक्रमाने ग्रामस्थ सुखावले आहे.

.       सुरला हा छोटासा गाव असून इथे बहुतांश शेतकरी हे प्रगतीशील आहे. शेत्या सिंचनाखाली आणून कपास, तूर, सोयाबीन, सोबत भाजीपाला पीक घेऊन सुरला येथील शेतकऱ्यांनी आपले आर्थिक स्रोत निर्माण केलेले आहे. काही शेतकरी बागायती शेती करीत आहे. परंतु गावातील संपूर्ण शेतकऱ्यांनी बागायती शेती करण्याचा संकल्प करावा असा संदेश प्रमोद नागापुरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. शेतकऱ्यांना बैलजोडी सोबत पशुपालक शेतकऱ्यांना फणस, जांभूळ, लिंबू आणि जाम या फळझाडांचे वाटप करण्यात आले.

.       यावेळी पोलीस पाटील आकाश धगडी, माजी सरपंचा माधुरी बदकी, सामाजिक कार्यकर्ता प्रवीण बदकी, उत्कृष्ठ व प्रगतीशील शेतकरी योगेश देसाई, अविनाश आमने, ग्रा. प. सदस्य रवींद्र देसाई, गोपिका परचाके तथा आदी गटग्रामपंचायत सदस्य बोर्डा -सुरला तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.