गौण खनिजाची वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले

44

महिला तलाठी पथकाची धडाकेबाज कारवाई

एकाच दिवशी ३ लाख 60 हजाराचा महसूल

वरोरा :  बकरी ईद निमित्त शासकीय सुट्टीचे दिवशी महसूल प्रशासनाच्या महिला तलाठी पथकाने एकाच दिवशी तीन ट्रॅक्टर ट्रॉली व पुरुष पथकाने 1 ट्रॅक्टर व ट्रॉली वाहनावरती अवैध गौण खनिज वाहतूक करणे करिता कारवाई करून वरोरा तालुका प्रशासनात आपले कामकाजाचा ठसा उमटविला आहे. सदर कारवाईमुळे शासनास अंदाजे तीन लाख साठ हजार रुपये इतका दंड महसूल प्राप्त होण्याची माहिती आहे.

.       प्राप्त माहितीनुसार दि 17 जून, रोजी अवैध उत्खनन तपासणी करीता ततलाठी, जळका दौऱ्यावर असतांना सकाळी 7 वाजताचे सुमारास मौजा – माढेळी गावाच्या परिसरात ट्रॅक्टर MH 34 BV 4696 या वाहनातून 100 घनफुट (1 ब्रास) रेती गौण खनिज वाहतूक करीत असतांना आढळुन आल्याने उक्त वाहन तहसील कार्यालय, वरोरा येथे जमा (डिटेन) करण्यात येऊन सदर वाहनाचा जप्तीनामा / पंचनामा करण्यात आला. सदर जप्तीनाम्यावरुन / पंचनाम्यावरुन सदर वाहन रामचंद्र मारोती येरचे रा. माढेळी ता. वरोरा जि. चंद्रपूर यांचे असल्याचे नमूद आहे.

.        तर दुसऱ्या कारवाईत अवैध उत्खनन तपासणी करीता तलाठी, जळका दौऱ्यावर असतांना सकाळी 6.10 वाजताचे सुमारास मौजा – पवनी गावाच्या परिसरात ट्रॅक्टर MH 34 BR 9456 या वाहनातून 100 घनफुट (1 ब्रास) रेती गौण खनिज वाहतूक करीत असतांना आढळुन आल्याने उक्त वाहन तहसील कार्यालय, वरोरा येथे जमा (डिटेन) करण्यात येऊन सदर वाहनाचा जप्तीनामा / पंचनामा करण्यात आला. सदर जप्तीनाम्यावरुन / पंचनाम्यावरुन सदर वाहन  सुमित कवडू मोहीतकर रा. येवती ता. वरोरा जि. चंद्रपूर यांचे असल्याचे नमूद आहे.

.       तर तिसऱ्या कारवाईत अवैध उत्खनन तपासणी करीता तलाठी, निलजई, सोईट, नागरी, तुळाणा दौऱ्यावर असतांना सकाळी 11.38 वाजताचे सुमारास मौजा – निलजई गावाच्या परिसरात MH 32 AH 2524 ट्रॅक्टर – या वाहनातून 100 घनफुट ( 1 ब्रास) रेती गौण खनिज वाहतूक करीत असतांना आढळुन आल्याने उक्त वाहन तहसील कार्यालय, वरोरा येथे जमा (डिटेन) करण्यात येऊन सदर वाहनाचा जप्तीनामा / पंचनामा करण्यात आला. सदर जप्तीनाम्यावरुन / पंचनाम्यावरुन सदर वाहन विपीन काकडे, रा. माढेळी ता. वरोरा जि. चंद्रपूर यांचे असल्याचे नमूद आहे.

.       तर चौथ्या कारवाईत अवैध उत्खनन तपासणी करीता तलाठी, शेगांव, चारगाव बु., चारगाव खुर्द, अर्जुनी, शेंबळ, राळेगाव दौऱ्यावर असतांना सकाळी 7.45 वाजताचे सुमारास मौजा – शेगांव गावाच्या परिसरात ट्रॅक्टर – विना नंबर या वाहनातून 100 घनफुट (1 ब्रास) रेती गौण खनिज वाहतूक करीत असतांना आढळुन आल्याने उक्त वाहन तहसील कार्यालय, वरोरा येथे जमा (डिटेन) करण्यात येऊन सदर वाहनाचा जप्तीनामा / पंचनामा करण्यात आला. सदर जप्तीनाम्यावरुन / पंचनाम्यावरुन सदर वाहन मारोती गायकवाड रा. वायगाव तूकम ता. भद्रावती जि. चंद्रपूर यांचे असल्याचे नमूद आहे.