एअरबोर्न ट्रेनिंग सेंटर व कर्मवीर विद्यालय वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी शिबिर संपन्न 

34

वरोरा : एअरबोर्न ट्रेनिंग सेंटर व कर्मवीर विद्यालय वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक कर्मवीर विद्यालय वरोरा येथे 28 दिवशीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध प्रकारचे पारंपरिक खेळ. तायक्वांदो , कबड्डी, व्हॉलिबॉल, डान्स,योगा ,लाठी काठी या खेळांचा सहभाग होता.

.       सदर शिबीर दि. 22 एप्रिल ते 18 मे दरम्यान दररोज सकाळी 6 ते 8 व सायंकाळीं 5.30 ते 7.30 असा एकूण 28 दिवसाचा उन्हाळी शिबिर घेण्यात आले होते. त्या शिबिरामध्ये एकूण 122 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. विविध प्रकारचे पारंपरिक खेळ. तायक्वांदो , कबड्डी, व्हॉलिबॉल, डान्स,योगा, लाठी काठी या खेळांचा सहभाग होता विद्यार्थांना रोज सकाळीं अल्पोपहार मिळत होता अश्या प्रकारे हे शिबिर व्यवस्थीत रित्या संपन्न झाला.

.        या शिबिराचे अध्यक्ष व एअरबोर्न ट्रेनिंग सेंटर चे अध्यक्ष अमन टेमुर्डे, उपाध्यक्ष हर्षदा कोहळे, सचिव सागर कोहळे, सुरेश बोभाटे, अशोक वर्मा, ऋषी मडावी, अनिल चौधरी, अॅड. घायवट यांचा शिबिरात विशेष सहभाग होता.  या शिबिराचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सचिन बोधाने, आकाश भोयर, अक्ष्यय हणमंते, गोसाई रामटेके, प्रणय मलोकर,दिव्या नंदनवार, निशा दास, दीक्षा दास, गणेश पुरी, आदर्श मुंगले यांनी मार्गदर्शन केले 18 मे ला सायंकाळीं 7 वाजत निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मणून अमन  टेमुर्डे प्रमुख अतिथी सो. म. भोंगळे, ना. गो. थुट, मुख्याध्यापक नरेंद्र बोरीकर, मुख्याध्यापक कृष्णाजी खानेकर, किशोर टोगें हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे कर्मवीर विद्यालय वरोरा येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शिरीष दडमल, वदणलवार, मनीषा वैद्य, नंदकिशोर मसराम, प्राची दाते, विशृती आवारी, मेघश्याम किन्नाके, विठ्ठल आत्राम यांचा या कार्यक्रमात विशेष सहभाग होता.