अवैद्यरित्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

63

महसूल पथकाची कारवाही 

वरोरा : मागील काही दिवसापासून रेती तस्करांविरुद्ध महसूल विभागाकडून कारवाहीचा बडगा पुकारल्याने अवैद्य रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. असे असतांनाही ग्रामीण भागात रेती तस्कर रेतीची तस्करी करत असल्याने वरोर्‍याचे तहसिलदार यांचे नेतृत्वात महसूल पथक अवैद्य उत्खनन तपासणी करिता वरोरा दौऱ्यावर असतांना मौजा एकार्जुना या गावात अवैद्य रित्या रेती वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर वर कारवाही करून तहसील कार्यालय वरोरा येथे जप्ती करण्यात आली.

.        प्राप्त माहिती नुसार वरोर्‍याचे तहसिलदार यांचे नेतृत्वात रेती माफिया विरोधात महसूल भरारी पथक निर्माण करण्यात आले. यात नायब तहसीलदार, तलाठी खांजी, तलाठी टेमुर्डा हे अवैद्य उत्खनन तपासणी करिता वरोरा दौऱ्यावर होते. दि २३ मे रोजी सकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास मौजा एकार्जुना गावाच्या परिसरात ट्रॅक्टर क्रमांक MH ३४ L ४१७० या वाहनातून 100 घनफुट ( 1 ब्रास) रेती गौण खनिज वाहतूक करीत असतांना आढळुन आल्याने उक्त वाहन तहसील कार्यालय, वरोरा येथे जमा करण्यात (डिटेन) येऊन सदर वाहनाचा जप्तीनामा करण्यात आला. सदर जप्तीनाम्यावरुन सदर वाहन बादल खुशाल नगाराळे रा. बोर्डा, ता.  वरोरा,  जि. चंद्रपूर यांचे असल्याचे नमूद आहे. या कारवाहीने रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.