लोहखनिज घेऊन जाणाऱ्या हायवा ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

46

सुरजागड चालणारी वाहने आणखी किती जीव घेणार

एक ठार एक गंभीर

कोठारी : बल्लारशहा – लोह खनिज घेऊन सुरजागड कडे जात असलेल्या भरधावं हायवा ट्रकने बल्लारशाह येथील बॉटनिकल गार्डन पाहून गावाकडे परत जात असलेल्या दुचाकीस्वारास चिरडले यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी असल्याची घटना कोठारी मार्गावर दि ११ मे शनिवारला सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली. या भीषण अपघातात गोंडपिपरी तालुक्यातील लिखितवाडा येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

.        प्राप्त माहितीनुसार लिखितवाडा येथील प्रेमदास छत्रपती सरवर (२२) व तारडा येथील मयूर नागोसे दोघेही मित्र बल्लारशाह येथील बॉटनिकल गार्डन पाहायला गेले असता परत येत असताना कोठारी पुलाजवळ लोह खनिज भरलेला हायवा व MH 34 BL 4039 दुचाकीची समोरासमोर धडक झाली. धडक जोरदार असल्याने प्रेमदासचा जागीच मृत्यू झाला. मृतक प्रेमदास याच्या पश्चात आई-वडील दोन बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार असून कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा असल्याने गावात शोककळ पसरली आहे.पुढील तपास कोठारीचे ठाणेदार आशिष बोरकर करीत आहे.

.        दिवसागणिक सुरजागड वाहतूक जीवघेणी ठरत असून नागरिकांच्या जीवावर उठली आहे. यापूर्वी अनेक अपघात झाले असून अनेकांचा जीव जाऊन कुटुंब उध्वस्त झाले आहेत. यावर शासनाने प्रतिबंध करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा भविषयात आशा घटना घडून नागरिकांच्या जीव धोक्यात येणार आह